घरCORONA UPDATEलॉकडाउनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे ७-८ लाख कोटींचे नुकसान शक्य

लॉकडाउनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे ७-८ लाख कोटींचे नुकसान शक्य

Subscribe

सेंट्रल इन्स्टिट्यूशनल रिसर्चने सांगितल्या प्रमाणे, संकटामुळे देश पुन्हा २०२०-२१ मध्ये एक अंक वृद्धी नोंदविण्याच्या मार्गावर पोहोचला आहे.

देशातील कोरोना विषाणूची महारोगराई थोपवण्यासाठी २५ मार्चपासून २१ दिवसांच्या टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे ७ ते ८ लाख कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते, असा अंदाज विश्लेषक आणि उद्योग संघटनांनी व्यक्त केला आहे. या देशव्यापी बंदमध्ये बहुतांश कारखाने आणि व्यवसाय ठप्प आहेत. उड्डाणेही रद्द आहेत आणि रेल्वे सेवा सुद्धा बंद आहे. तसेच वाहन आणि लोकांच्या प्रवासावरही निर्बंध आले आहेत. यामुळे ७० टक्के आर्थिक उत्पादन, गुंतवणूक, निर्यात आणि अत्यावश्यक वस्तू वगळता अन्य उत्पादनांची विक्री ठप्प आहे. केवळ कृषी, खाण, अत्यावश्यक सेवा, काही वित्तीय आणि आयटी सेवा व लोकसेवांनाच कामावर परवानगी मिळाली आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूशनल रिसर्चने सांगितल्या प्रमाणे, संकटामुळे देश पुन्हा २०२०-२१ मध्ये एक अंक वृद्धी नोंदविण्याच्या मार्गावर पोहोचला आहे. देशव्यापी टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेला ७-८ लाख कोटींचे नुकसान होण्याचा अंदाज आहे. याशिवाय अँक्युट रेटिंग्ज अँड रिसर्च लिमिटेडने अंदाज व्यक्त केला होता की, टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेला रोज ४६४ कोटी डॉलर (३५,००० कोटी रु.) चे नुकसान होत आहे.

रिटेलचे सर्वाधिक जास्त नुकसान

छोट्या दुकानदारांची देशव्यापी संघटना कॅटनुसार, देशव्यापी बंदमुळे रिटेलमध्ये २.२८ लाख कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. रिटेल सेक्टरमध्ये ७ कोटी लहान, मध्यम, मोठे दुकानदार आहेत.

- Advertisement -

रिअल इस्टेट क्षेत्राचे १ लाख कोटींचे नुकसान

रिअल इस्टेट क्षेत्राची स्वयं नियामक शाखा नारेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी सांगितल्या प्रमाणे, रिअल इस्टेट क्षेत्रात टाळेबंदीमुळे १ लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -