घरदेश-विदेशमोदींच्या मनात बसले आहेत तोपर्यंत फडणवीसांच्या खुर्चीला धोका नाही!

मोदींच्या मनात बसले आहेत तोपर्यंत फडणवीसांच्या खुर्चीला धोका नाही!

Subscribe

मराठा आरक्षणाची धग थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या खुर्चीपर्यंत जाऊन पोहचल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी,देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहेत, तोपर्यंत त्यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे.

मराठा आरक्षणाची धग थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या खुर्चीपर्यंत जाऊन पोहचल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी ,देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहेत, तोपर्यंत त्यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. भाजप खासदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘आपलं महानगरशी ’बोलताना ही माहिती दिली. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भाजपमधून मुख्यमंत्री हटाव मोहीम जोर धरू लागली आहेअसे बोलले जात आहे.

मोदींचा पाठींबा फडणवीस यांनाच असून त्यांना बदलून चंद्रकांत पाटील, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्या नावाची दबक्या आवाजात सुरू झालेली चर्चा पेल्यातील वादळ ठरले आहे. निवडणुकीच्या वर्षात फडणवीस यांना बदलून मराठा किंवा बहुजन समाजाचा नेता मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा विचार दिल्लीत सुरू झाल्याचे गेले काही दिवस बोलले जात आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी तसे उघड बोलूनही दाखवले. मात्र भाजप खासदारांना तसे वाटत नाही.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि चंद्रकांत पाटील यांचे उत्तम संबंध असून हासभास नसताना ते मंत्रिमंडळात आले.

- Advertisement -

एकनाथ खडसे यांना दुसर्‍या क्रमांकावरून हटवल्यानंतर चंद्रकांतदादा हे फडणवीस यांच्यानंतरचा राज्यातील प्रमुख चेहरा म्हणून पुढे आले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव असणार्‍या मराठा समाजाच्या पक्षाचे नेते म्हणून त्यांना पुढे करण्यात आले. विनोद तावडे आणि पंकजा मुंडे या महत्वाकांक्षी नेत्यांना बाजूला सारून चंद्रकातदादांचे नाव दिल्ली हायकमांडने ठरवून पुढे आणले आहे. मराठा आरक्षण मागणीने क्रांती मोर्चाने वातावरण मुख्यमंत्र्यांविरोधात पेटत चालल्याने दिल्लीत त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्रांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोहीम उघडल्यानंतर त्याचा परिणाम होऊन खासदार सुप्रिया सुळे आणि धनंजय महाडिक या राष्ट्रवादी खासदारांनी फडणवीस यांना टार्गेट केले. त्यांनतर शिवसेना खासदार विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. तर संजय राऊत यांनी भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाचे जोरदार वारे वाहत असल्याचे सांगून आगीत तेल ओतले.

शेतकरी, आदिवासी आणि मराठा आंदोलनाने गेल्या दोन वर्षांत जोर धरला आहे. 58 मोर्चे शांततेत काढूनही पदरी काही पडत नसल्याने सकल मराठा आक्रमक झाला आहे. याचा फटका पुढील वर्षात पक्षाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये बसू शकतो, असा प्रवाह भाजप पक्षात दिसून येत आहे. मराठ्यांचा रोष थेट मुख्यमंत्र्यांविरोधात असताना त्यांच्याविरोधात भाजपचे खासदार थेट बोलायला तयार नाहीत. तीच अवस्था राज्यातील भाजप आमदारांची आहे. कारण नाना पटोले आणि शत्रुघ्नसिन्हा यांनी स्पष्ट बोलायला सुरुवात केल्यानंतर त्यांना पक्ष सोडावा लागला. त्यामुळे आता सर्वजण मूग गिळून बसले आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्री बचाव मोहीम तातडीने राबवली

मुंबईसह परिसरात बुधवारी मराठा आंदोलन पेटल्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठींनी याची दखल घेत फक्त तातडीने यावर उपाय करा, अशा सूचना केल्यानंतर गेले काही दिवस मराठा मोर्चा आंदोलकांशी साधे बोलण्याची तयारी न दाखवणारे मुख्यमंत्री अचानक चर्चेसाठी तयार झाले. त्याचवेळी चंद्रकांतदादा यांच्यानंतर राज्यातील तिसर्‍या क्रमांकाचे नेतृत्व सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने खुलासा करताना मुख्यमंत्री बदलाचे वारे खोडून काढले.

 

मराठा आंदोलनाचा फटका बसू लागल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात सध्या चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाला तोंड देण्यात सरकार पुरते अपयशी ठरले आहे. नेतृत्व बदलाचा निर्णय पंतप्रधान मोदी वा पक्षाध्यक्ष शाह यांनी घ्यायचा आहे. सरकारने बघ्याची आणि पळपुटी भूमिका घेऊ नये – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -