घरCORONA UPDATECoronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे ४४१ नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या ८,६१३

Coronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे ४४१ नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या ८,६१३

Subscribe

मुंबईत रविवारी ४४१ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ८,६१३ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ३४३ वर पोहचला आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ रविवारीही कायम राहिली. मुंबईमध्ये ४४१ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ८,६१३ वर पोहचली आहे. ३० एप्रिल आणि १ मेदरम्यान प्रयोगशाळांमध्ये केलेल्या ६० जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल रविवारी आल्याने त्याचाही यात समावेश केला आहे.

मुंबईमध्ये २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३४३ वर पोचली आहे. मृत्यू झालेल्या २१ जणांमध्ये १० जण हे दीर्घकाळ आजारी होते. तर ७ जणांचा वार्धक्याने मृत्यू झाला आहे. यामध्ये १२ पुरुष तर ९ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ११ जण हे ६० वर्षांवरील, ९ जण हे ४० ते ६० च्या दरम्यान तर एकाचे वय ४० वर्ष होते.

- Advertisement -

मुंबईत कोरोनाचे ४६९ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ११ हजार ४६४ वर पोहचली आहे. तसेच १०० रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल १८०४ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -