धारावीत आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच मागील जून महिन्यापासून ही संख्या नियंत्रणात येताना दिसत आहे. मात्र, शनिवारी दिवसभरात धारावीत केवळ ७ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आजवरची ही सर्वांत कमी रुग्ण संख्या आहे.
धारावी, माहिम आणि दादर या जी-उत्तर विभागात दिवसभरात एकूण ३४ रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत या विभागांमध्ये एकूण रुग्ण संख्या ३ हजार ६९६ एवढी झाली आहे. यामध्ये धारावीत दिवसभरात ७ रुग्ण आढळून आले. त्यामुळे धारावीतील एकूण रुग्ण संख्या २ हजार १५८ वर पोहोचली आहे. तर दादरमध्ये दिवसभरात ९ रुग्ण तर माहिममध्ये त्याच्या दुप्पट अर्थात १८ रुग्ण आढळून आले. त्यामुळे या दोन्ही भागांमध्ये अनुक्रमे एकूण रुग्ण संख्या ६३३ आणि ९०२ एवढी झाली आहे.
- Advertisement -
- १ जून २०२० : रुग्ण संख्या ३४
- २ जून २०२० : रुग्ण संख्या २५
- ३ जून २०२० : रुग्ण संख्या १९
- ४ जून २०२० : रुग्ण संख्या २३
- ५ जून २०२० : रुग्ण संख्या १७
- ६ जून २०२० : रुग्ण संख्या १०
- ७ जून २०२० : रुग्ण संख्या १३
- ८ जून २०२० : रुग्ण संख्या १२
- १० जून २०२० : रुग्ण संख्या ११
- ११ जून २०२० : रुग्ण संख्या २० (म़त्यू २)
- १२ जून २०२० : रुग्ण संख्या २९(म़त्यू २)
- १३ जून २०२० : रुग्ण संख्या १७
- १४ जून २०२० : रुग्ण संख्या १३
- १५ जून २०२० : रुग्ण संख्या २५
- १६ जून २०२० : रुग्ण संख्या २१
- १७ जून २०२० : रुग्ण संख्या १७, (म़त्यू १)
- १८ जून २०२० : रुग्ण संख्या २८
- १९ जून २०२० : रुग्ण संख्या १७
- २० जून २०२० : रुग्ण संख्या ०७
हेही वाचा – मुंबईत पाऊस काही दिवस घेणार विश्रांती