घरदेश-विदेशशिवाजी महाराजांवर विनोद केल्यामुळे ट्विटरवर व्यक्त होतोय संताप

शिवाजी महाराजांवर विनोद केल्यामुळे ट्विटरवर व्यक्त होतोय संताप

Subscribe

शिवाजी महाराजांवर विनोद केल्यामुळे ट्विटरवर संताप व्यक्त केला जात आहे. अग्रिमा जोशुआ या स्टँड-अप कॉमेडी करणाऱ्या तरुणीने शिवाजी महाराजांवर विनोद केला आहे. यावरुन ट्विटरवर संताप व्यक्त केला जात असून पोलिसांकडून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

अग्रिमा जोशुआ या स्टँड-अप कॉमेडी करणाऱ्या तरुणीने मुंबईतील शिवस्मारक बद्दल उल्लेख केला आहे. “शिवाजी यांच्या पुतळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी ‘quora’ या इंटरनेटवरील एका विश्वसनीय सोर्सवर गेली. येथे एकाने यावर निबंध लिहला होता. शिवाजी यांचा पुतळा हा एक मास्टरस्ट्रोक आहे जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे होणार आहे. जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता येईल. त्यानंतर आणखी एक व्यक्ती आला त्याला वाटलं हा एक क्रिएटिव्हिटी काँटेस्ट आहे. तो म्हणाला, यामध्ये जीपीएस ट्रॅकर सुद्धा आहे. शिवाय त्यांच्या डोळ्यातून लेझर लाईट निघेल जी पाकिस्तानी आतंकवाद्यांना रबी समुद्रात मारण्यास मदत करेल. अशातच एक तिसरा व्यक्ती येतो आणि म्हणतो तुमचं तथ्य बरोबर करा शिवाजी नाही शिवाजी महाराज, बस्स मी त्यालाच फॉलो केलं.” असं या या स्टँड-अप कॉमेडी करणाऱ्या तरुणीने तिच्या विनोदात म्हटलं आहे.

- Advertisement -

यावरुन आता ट्विटवर नाराजी व्यक्त केली जात आहे. एका ट्विटर यूजरने लिहिलं आहे, “स्वस्त हास्यांसाठी राजांची थट्टा करणे फॅशनेबल झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारतासाठी एक आदर्श आहेत. त्यांनी १८ पगड जातींना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. ही तरुणी रयतेच्या राजाची थट्टा करत आहे. कृपया या महिलेस अटक करा.”

“छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर नसलेल्या या तथाकथित विनोदी कलाकारांवर त्वरित कारवाई केली पाहिजे. अद्याप अटक कशी झाली नाही?”

- Advertisement -

“ती छत्रपती शिवाजी महाराजांची उघडपणे खिल्ली उडवत आहे.
फक्त #शिवाजीमहाराजच नाही तर हे विनोदी कलाकार आमच्या देवांचीही खिल्ली उडवतात.”

दरम्यान, काहींनी तिचं समर्थन करत ती छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा करत नसून सत्य परिस्थिती मांडत आहे असं म्हटलंय. देशाला पुतळ्यांची नाही तर चांगल्या सुविधांची गरज आहे, असं काहींनी म्हटलं आहे.

“नाही, ती शिवाजी महाराजांची खिल्ली उडवत नाही आहे, तिने नुकतंच सरकारच्या अपयशाचा पर्दाफाश केला आहे, कोविड-१९ ने आपली आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उघडकीस आणली आहे, अब्ज डॉलर्सचे पुतळे नाही तर चांगली सुविधा देणे ही काळाची गरज आहे. मला सांगा गेल्या ४ महिन्यांत  किती पर्यटकांनी सरदारला पटेल यांच्या पुतळ्याला भेट दिली?” असं एका ट्विटर यूजरने म्हटलं आहे.

कोण आहे अग्रिमा जोशुआ?

अग्रिमा जोशुआ ही स्टँड-अप कॉमेडी करणारी तरुणी आहे. तिचं यूट्यूब चॅनेल आहे. तिचा ‘उत्तर प्रदेश हे भारताचं टेक्सास आहे’ हा व्हिडीओ चांगलाच गाजला होता. ही तरुणी राजकीय विनोदांवरुन चांगलीच चर्चेत राहिली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -