चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीत घराचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहेत. अशा परिस्थितीत जागोजागी इमारत तसेच घराचे छप्पर कोसळल्याच्या घटना समोर येतात. त्यातच आज चेंबूरमधील ही घटना समोर आली आहे.
Maharashtra: One dead and four injured after part of a building collapsed in Chembur area of Mumbai today. pic.twitter.com/I640sPG5uC
— ANI (@ANI) August 13, 2020
या घरात पोटमाळ्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तसेच ढिगारा काढण्यात येत आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून जखमींना राजावडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.