राजस्थान रॉयल्सचा प्रमुख खेळाडू बेन स्टोक्स आयपीएल स्पर्धेच्या काही सामन्यांना मु
त्याला क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार
न्यूझीलंडमध्ये स्टोक्सला नियमानुसार १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागले. आता तो त्याच्या वडिलांना भेटू शकणार आहे. त्यांच्यासोबत त्याला थोडा वेळ घालवायला आवडेल. त्यानंतर तो युएईत दाखल झाल्यावर त्याला पुन्हा क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. त्यामुळे तो निम्म्या आयपीएलला मुकण्याची शक्यता आहे. आम्ही त्याची परिस्थिती समजू शकतो. आम्ही त्याला फोनही करणार नाही. सध्या त्याने कुटुंबासोबत वेळ घालवणे गरजेचे आहे. काही काळानंतर आयपीएलमध्ये खेळण्याबाबत आम्ही त्याच्याशी चर्चा करू, असे राजस्थान रॉयल्समधील सूत्रांचे म्हणणे होते. यंदा युएईत होणाऱ्या आयपीएल स्पर्धेला १९ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. राजस्थानचा सलामीचा सामना २२ सप्टेंबरला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होईल.