घरताज्या घडामोडीCoronavirus: दिलासा! पोलीसबाधितांच्या संख्येत घट; २४ तासांत राज्यात १७९ पोलिसांना कोरोना

Coronavirus: दिलासा! पोलीसबाधितांच्या संख्येत घट; २४ तासांत राज्यात १७९ पोलिसांना कोरोना

Subscribe

पोलिसांना होणाऱ्या कोरोनाच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मागील २४ तासांत राज्यातील १७९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन पोलिसांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तसेच या कोरोनाचा विळखा आता कोरोना योद्धांमध्ये होताना दिसत आहे. सामान्य नागरिकांसाठी या संकटात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांमध्ये कोरोनाची लागण होताना दिसत आहे. मात्र, एक दिलासादायक बाब म्हणजे पोलिसांना होणाऱ्या कोरोनाच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मागील २४ तासांत राज्यातील १७९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन पोलिसांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

- Advertisement -

कोरोनाबाधितांची संख्या १७ हजार पार

राज्यात २४ तासांत १७९ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता १७ हजार ९०१ इतकी झाली आहे. यापैकी १३ हजार ८५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३ हजार ६४ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत, अशी माहिती एएनआयने दिली आहे.

कोरोनामुळे १७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

राज्यात कोरोनाने आतापर्यंत १७६ पोलिसांचा बळी घेतला आहे. तर ३ हजार ६४ Active रुग्ण असून सध्या ते उपचार घेत आहेत. तर पोलीस दलात संसर्ग झालेल्या पोलिसांमध्ये आतापर्यंत १३ हजार ८५१ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पुणेकरांनो लग्न करताय? विवाह समारंभासाठी नवे आदेश जाहीर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -