घरताज्या घडामोडीSushant Singh Case: मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि शरद पवार यांच्यात...

Sushant Singh Case: मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि शरद पवार यांच्यात बैठक

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे एक बैठक सुरु झालेली आहे. या बैठकीला दोघेही सकाळी १० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे दाखल झाले. गेल्या काही दिवसांपासून सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी चालू आहे. त्यामध्ये मुंबई पोलिसांवर बरीच टीका करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी वेळीच एफआयआर दाखल केला नाही असा आरोप करण्यात आला होता.

त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे गेलं. यानंतर ईडी आणि एनसीबी देखील या प्रकरणाच्या चौकशीत दाखल झाली. मागिल काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकारमधील घटक पक्ष शिवसेना यांच्यामध्ये शाब्दिक वाक् यूद्ध सुरु आहे. यामध्ये कुठेतरी सरकारची बदनामी होत असल्याचं चित्र दिसतंय. यानंतर शरद पवार यांनी परमबीर सिंग यांच्यासोबत बैठक घेण्याचा निर्णय घेतला असावा. या बैठकीमध्ये सुशांतसिंह प्रकरणात अद्याप काय चौकशी झाली आहे याचा आढावा घेऊ शकतात. तसंच पुढे हे प्रकरण कसं हाताळायचं याचेही निर्देश शरद पवार देऊ शकतात. दरम्यान, ही बैठक संपली असून तब्बल २० मिनिटं चर्चा झाली.

- Advertisement -

 

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी घेतली शरद पवार यांची भेट | यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दोघांमध्ये २० मिनिट चर्चा झाली

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Wednesday, 9 September 2020


हेही वाचा – कंगना रनौतप्रकरणी राज्यपाल सरकारवर नाराज, केंद्राला अहवाल देणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -