घरमनोरंजनजेव्हा अशोक सराफ बनतात 'लव्हगुरू'

जेव्हा अशोक सराफ बनतात ‘लव्हगुरू’

Subscribe

लव्हगुरु साकारणाऱ्या अशोक सराफ यांचं चित्रपटात कॉमेडी आणि रोमँटिक मूडचं एक वेगळं मिश्रण पाहायला मिळणार आहे.

 या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. रोमँटिंक कथानक असलेल्या या चित्रपटात अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. खऱ्या आयुष्यात नुकताच साखरपुडा केलेलं हे कपल आता पडद्यावरही रोमान्स करताना दिसणार आहेत. मात्र, या ‘‘चं विशेष आकर्षण ठरतायत सर्वांचे लाडके ‘अशोक मामा’ अर्थात अभिनेते अशोक सराफ. मराठीतील विनोदवीर अशोक सराफ या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहेत. गेली अनेक वर्षे प्रेक्षकांना हसवणारे अशोक मामा या चित्रपटात ‘लव्हगुरू’च्या भूमिकेत दिसणार आहेत. काहीच दिवसांपूर्वी 

अशोक मामांचा नवा अंदाज

चित्रपटाचे निर्माते विनोदकुमार जैन एका मुलाखतीदरम्यान म्हणाले, ‘आपण गेल्या अनेक वर्षांपासून अशोक सराफ यांना कॉमेडीचा बादशाह म्हणून ओळखतो. मात्र, या चित्रपटात तुम्ही अशोक मामांचा एक नवा अंदाज पाहायला मिळेल. लव्हगुरु साकारणाऱ्या अशोक सराफ यांचं चित्रपटात कॉमेडी आणि रोमँटिक मूडचं एक वेगळंच मिश्रण पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनाही त्यांची लव्हगुरुची भूमिका आवडेल असा आम्हाला विश्वास आहे.’
Hrudayat Something Something
‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटाचं फर्स्ट पोस्टर (सौ.इन्स्टाग्राम)
अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, प्रियांका जाधव आणि भूषण कडू अशी स्टारकास्ट या चित्रपटात झळकणार आहे. दरम्यान ‘‘ हा चित्रपट येत्या ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा : अशोक मामा तुम्हीच आहात बाप!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -