घरमुंबईSushant Death Case : राष्ट्रवादी - भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी

Sushant Death Case : राष्ट्रवादी – भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत दिल्लीतील एम्सच्या पथकाचा अहवाल येऊन दोन दिवस उलटल्यानंतरअहवालातील निष्कर्षावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी उडाल्या. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी भाजपवर निशाणा साधत महाराष्ट्राची माफी मागण्याची मागणी केली. तर भाजप आमदार राम कदम यांनी राज्य सरकारनेच मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचा पलटवार केला.

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात एम्समधील डॉक्टरांच्या पथकाने सुशांतचा मृत्यू हा आत्महत्या असल्याचे अहवालात म्हटले आहे. विरोधी पक्षाने सुशांतची हत्या झाल्याचा आरोप केला होता. अहवाल आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखआज चांगलेच आक्रमक झाले. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम ज्यांनी केले, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी देशमुख यांनी मंगळवारी केली. अन्यथा जनता माफ करणार नाही, असेही त्यांनी ठणकावले. महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना बदनाम करणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांना प्रचाराला बिहाराचे भाजप प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस जाणार का, असा सवालही देशमुख यांनी केला.

- Advertisement -

ज्यांनी पाच वर्ष महाराष्ट्राचे नेतृत्त्व केले, मुंबई पोलीस दल आणि महाराष्ट्र पोलिसांचे नेतृत्त्व केले. त्या देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु नसल्याचे म्हटले होते. ज्या पद्धतीने महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम काही पक्षांमार्फत झाले ते पाहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, असे देशमुख म्हणाले.

पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला – राम कदम

मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचे काम महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या सरकारने केले. या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केला. मुंबई पोलिसांची प्रतिमा ही शौर्याची आहे. त्यांना मोकळेपणाने काम करु द्यावे. त्यांच्या कामात हस्तक्षेप करु नये, अशीच आमची भूमिका होती. सरकारमधील तीन पक्षांनीच पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला, असा आरोपही राम कदम यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा –

UP सरकारवर अजून एक बट्टा; बलात्कार झालेल्या ६ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -