घरताज्या घडामोडीतळोजा तुरुंगाबाहेर मुख्यमंत्री आणि अर्णब गोस्वामीच्या समर्थकांमध्ये रंगली घोषणाबाजी

तळोजा तुरुंगाबाहेर मुख्यमंत्री आणि अर्णब गोस्वामीच्या समर्थकांमध्ये रंगली घोषणाबाजी

Subscribe

सुरक्षेच्या कारणास्तव रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथून तळोजा तुरुगांत आणले गेले आहे. त्यानंतर तळोजा तुरुंगाबाहेर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्णब गोस्वामी यांच्या समर्थकांमध्ये घोषणा वॉर चांगलेच रंगल्याचे दिसून आले. रविवारी सकाळी गोस्वामीना घेऊन पोलीस तळोजा जेलमध्ये पोहचताच उद्धव व अर्णव समर्थक जेलबाहेर पोहचले. यावेळी उद्धव समर्थकांनी ठाकरे सरकार आणि मुंबई पोलिसांच्या समर्थनात जोरदार घोषणा दिल्या. अर्णब समर्थकांनी अर्णब जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. तर मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांनी मुंबई पोलिसांचे आभार माननारे पोस्टर्स झळकवत घोषणाबाजी केली. मात्र, कडक पोलीस बंदोबस्त असल्याने दोन्ही समर्थक आमने सामने आले नाहीत.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग येथे न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रविवारी तळोजा कारागृहात आणले आले आहे. दोन दिवस त्यांना अलीबाग येथील मराठी शाळेच्या उप कारागृहात ठेवण्यात आले होते. तळोजामध्ये आणल्यानंतर भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत सरकारवर आरोप केला. पोलिसांनी मुद्दामहून अर्णब यांचा शारीरिक छळ चालविला असल्याचे राणे म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisement -

अर्णब गोस्वामी यांना ४ नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात ही अटक करण्यात आलेली होती. न्यायालयाने मुंबई पोलिसांची कोठडी नाकारून गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान गोस्वामी हे जामीनासाठी सतत प्रयत्न करत आहेत. मात्र ही सुनावणी आता ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात फिरोज शेख आणि नितेश सारडा अशा दोन आरोपींना देखील अटक करण्यात आलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -