घरलाईफस्टाईलचिमूटभर बेकिंग सोडा दूर करेल त्वचेच्या समस्या

चिमूटभर बेकिंग सोडा दूर करेल त्वचेच्या समस्या

Subscribe

अनेकांना आपला चेहरा सुंदर आणि मुलायम दिसावा असे वाटत असते. याकरता अनेक उपाय देखील केले जातात. तर बऱ्याच तरुणी पार्लरमध्ये जाऊन ट्रिटमेंट देखील घेत असतात. पण, काही केल्या अनेकांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि खड्डे काही दूर होत नाही. अशावेळी काही घरगुती उपाय केल्यास चेहऱ्यावरील मुरुम, सुरकुत्या ते चेहऱ्यावरील खड्डे सहजरित्या दूर होण्यास मदत होते.

मुरुम आणि पुटकुळ्या

- Advertisement -

मुरुम आणि पुटकुळ्या असल्यास बेकिंग सोडा एक रामबाण उपाय आहे. याकरता एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा पाणी घेऊन त्याची चांगली पेस्ट करुन तो पॅक चेहऱ्याला लावावा. तसेच ही पेस्ट आपल्या नाकावर लावून हलक्या हाताने रडगा. यामुळे नाकावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाइट हेड्स निघून जाण्यास मदत होते.

सुरुकुत्या घालवा

- Advertisement -

बऱ्याचदा वय झाले का चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. या सुरुकुत्या घालवण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा लिंबूचा रस एकत्र करुन तो पॅक चेहऱ्याला लावावा. यामुळे सुरुकुत्या घालवण्यास मदत होते.

खड्डे बंद करा

बऱ्याचदा चेहऱ्यावरील खड्डे सौंदर्यात बाधा आणतात. हे खड्डे दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. अशावेळी बेकिंग सोडा एक रामबाण उपाय आहे. १ कप पाणी घेऊन त्यात थोडा बेकिंग सोडा एकत्र करुन ती तयार पेस्ट चेहऱ्यावर लावावी. यामुळे खड्डे बंद होण्यास मदत होते.

चमकदार स्किन

चमकदार स्किनकरता २ चमचे ताज्या संत्र्याचा जूस एक चमचा बेकिंग सोडा एकत्र करुन ही तयार पेस्ट चेहऱ्याला लावावी. यामुळे चेहरा चकमकण्यास मदत होते.

त्वचेचा काळेपणा दूर होतो

त्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठी २ चमचे गुलाब पाणी आणि १ चमचा बेकिंग सोडा एकत्र करुन त्याची पेस्ट तयार करावी. ही तयार पेस्ट चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्याचा काळपटपणा दूर होण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -