घरताज्या घडामोडीपेरू खाल्ल्याने होतात 'हे' फायदे

पेरू खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे

Subscribe

हिवाळाच्या मोसमात पेरू हे फळं बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. या दिवसांमध्ये पेरू खाण्याचे खूप आरोग्यदायी फायदे आहेत. पेरू या फळात जीवनसत्व अ आणि क भरपूर प्रमाणात असते, जे शरीराला खूप आरोग्यपूर्ण राहण्यास मदत करते. असेच काही पेरू खाण्याचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.

  • पेरूमुळे मेटाबॉलिज्म वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते. तसेच पेरू खाल्लानंतर पोट भरते आणि कॅलरी इनटेक देखील कमी होते. इतर फळांच्या तुलनेत पेरूमध्ये जास्त शुगरचे प्रमाण असते.
  • हृदयासंबंधी आजारांवर पेरू फळं खूप उपयुक्त ठरते. जेवणासोबत पेरूची चटणी आणि पेरूचा मुरब्बा तीन महिने खाणे हे हृदयासंबंधीत आजारांशी फायदेशीर ठरते.
  • तसेच पेरू नियमित सेवन केल्याने रक्तासंबंधी विकारही दूर होतात.
  • सात्विक गुणधर्माचा आणि बुद्धिवर्धक असा पेरू असल्यामुळे बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तीने पेरू खाल्ला तर मानसिक थकवा दूर होतो आणि ऊर्जा प्राप्त होते.
  • पेरू त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असतो. पेरूमध्ये फॉलिक अॅसिड, पोटॅशिअर, तांबे आणि मँगजीन धातू मोठ्या प्रमाणात असतात. यामुळेच सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या कंपन्या पेरूचा जास्त वापर करतात.
  • तसेच पेरूच्या बिया चावून खाल्ल्याने शरिरातील लोहाची कमतरता भरून काढते. महत्त्वाचे म्हणजे पेरूतील लायकोपीन घटक कॅन्सर आणि ट्यूमरचा आजार दूर होण्यास मदत करते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -