घरताज्या घडामोडीभारत बंद; राजकारण्यांची टिवटिवाट

भारत बंद; राजकारण्यांची टिवटिवाट

Subscribe

कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. आज सकाळी ११ पासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत ‘भारत बंद’ची घोषणा दिली आहे. कडाक्या थंडीत दिल्ली गेल्या १२ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पंजाब आणि हरियाणाचे शकडो शेतकरी या आंदोलनात सामील आहेत. पण आतापर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्यावर सरकार सकारात्मक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आज शेतकरी संघटनांकडून ‘भारत बंद’ पुकारण्यात आला. याच पार्श्वभूमीवर राजकारणातील अनेक नेते मंडळींनी ट्विट करून ‘भारत बंद’ विषयी आपले मत मांडले आहे. नक्की ‘भारत बंद’ विषयी कोण काय म्हणाले? वाचा

- Advertisement -

 

- Advertisement -

‘शेतकऱ्यांना मागितल्या जाणाऱ्या मोबदल्याच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक किंमत आम्ही देत आहोत. कॉंग्रेसेने त्यांच्या राजवटीत काहीही देऊ केले नाही. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच ही अतिरिक्त किंमत दिली आहे. विरोधी पक्षाकडून संपुर्ण कायदाच बदलण्याची भाषा ही ढोंगीपणाची आहे. कॉंग्रेसच्याच काळात कंत्राटी शेतीचे कायदे संमत झाले. महत्वाच म्हणजे कॉंग्रेसनेच या कायद्यांचा समावेश त्यांच्या जाहीरनाम्यातही केला आहे,’ असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले आहे.


हेही वाचा – कंगना ‘भारत बंद’वर म्हणते, ‘आणा कुऱ्हाड, विषय संपवून टाकू’


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -