घरक्रीडा'त्या' कृतीबद्दल मुशफिकूरने मागितली माफी! 

‘त्या’ कृतीबद्दल मुशफिकूरने मागितली माफी! 

Subscribe

मी अशा प्रकारची चूक करणार नाही याची खात्री देतो, असे मुशफिकूरने सांगितले. 

क्रिकेट हा ‘जेंटलमेन्स गेम’ म्हणून ओळखला जातो. आपल्या आणि प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना मान देतच क्रिकेट खेळले गेले पाहिजे, असे म्हटले जाते. बांगलादेशमधील स्थानिक स्पर्धा ‘बांगाबंधू टी-२० कप स्पर्धेत’ मात्र या भावनेच्या विरुद्ध एक घटना घडली. या स्पर्धेत सोमवारी बेक्सिमो ढाका आणि फॉर्च्यून बरीसाल यांच्यात सामना झाला. या सामन्यादरम्यान बरीसालच्या फलंदाजाने हवेत मारलेला चेंडू पकडण्यासाठी यष्टीरक्षक मुशफिकूर मागच्या दिशेने धावला. मात्र, त्याचवेळी आणखी एक खेळाडू (नासूम अहमद) झेल पकडण्यासाठी आल्याने मुशफिकूर भडकला आणि त्याने थेट त्या खेळाडूवर हात उगारला. मात्र, सोशल मीडियावरून टीका झाल्यानंतर मुशफिकूरने फेसबुकच्या माध्यमातून चाहत्यांची आणि नासूम अहमदची माफी मागितली आहे.

सर्वप्रथम मी कालच्या सामन्यातील त्या कृत्यासाठी चाहत्यांची माफी मागतो. मी सामना संपल्यावर लगेचच माझा सहकारी नासूमची माफी मागितली होती. मी एक माणूस आहे आणि माझी ती कृती स्वीकारार्ह अजिबातच नव्हती. माझ्याकडून चूक झाली आणि पुन्हा मी अशा प्रकारची चूक करणार नाही याची खात्री देतो, असे मुशफिकूरने त्याच्या फेसबुकवरील पोस्टमध्ये लिहिले. तसेच या पोस्टमध्ये मुशफिकूरने नासूमसोबतचा फोटोही शेअर केला. त्या कृतीबद्दल बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मुशफिकूरला सामन्यातील मानधनाच्या २५ टक्के रक्कम दंड ठोठवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -