घरक्रीडाIND vs AUS : सिडनी कसोटीत केवळ २५ टक्के प्रेक्षक राहणार उपस्थित

IND vs AUS : सिडनी कसोटीत केवळ २५ टक्के प्रेक्षक राहणार उपस्थित

Subscribe

हा सामना ९५०० प्रेक्षकच पाहू शकणार आहेत. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याला ७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. हा सामना केवळ २५ टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवला जाणार असल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली आहे. सिडनी ही न्यू साऊथ वेल्स राज्याची राजधानी असून तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे न्यू साऊथ वेल्स सरकारने सिडनी कसोटीसाठी केवळ २५ टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे हा सामना ९५०० प्रेक्षकच पाहू शकणार आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन केले. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने मेलबर्नमध्ये झालेला दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधली होती. आता या मालिकेतील तिसरा सामना ७ जानेवारीपासून सिडनीत खेळला जाणार आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडची एकूण आसन संख्या ३८ हजार असून या सामन्यात २५ टक्के म्हणजेच ९५०० प्रेक्षकांना प्रवेश मिळणार आहे.

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग खूप महत्वाचे झाले आहे. त्यामुळे आम्हाला सिडनी क्रिकेट ग्राऊंडची क्षमता कमी करणे गरजेचे होते. तिकीट विकत घेतलेल्या प्रेक्षकांनी संयम दाखवल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकली म्हणाले. याआधी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन एकदिवसीय व दोन टी-२० सामने झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -