घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत २४ तासांत आढळले ६६५ नवे रुग्ण, ७ जणांचा मृत्यू

Live Update: मुंबईत २४ तासांत आढळले ६६५ नवे रुग्ण, ७ जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबई गेल्या २४ तासांत ६६५ नवे रुग्ण आढळले असून ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ३७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ९६ हजार ९८४वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार १६२ रुग्णांचा मृत्यू झाला असून २ लाख ७७ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ७२९ नवे रुग्ण आढळले असून ३ हजार ३५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच ७२ हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १९ लाख ५८ हजार २८२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४९ हजार ८९७ जणांचा मृत्यू झाला असून १८ लाख ६५ हजार १०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ५१ हजार १११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

गृहविभागाने ४ जानेवारीला काढलेला पोलीस भरतीचा जीआर रद्द केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.


कॉमेडियन कपिल शर्माची क्राईम ब्रांचकडून छाब्रिया प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे.


महाविकास आघाडीला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. नीलम गोऱ्हे यांच्या विधान परिषद उपसभापती पदावरील नियुक्तीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दाखल केलेली याचिका. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय योग्यच, राज्य सरकारचे मत न्यायालयाने योग्य मानले.


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पराभव मान्य केला आहे.


रेल्वे चीफ बुकिंग ऑफिसर कैलाश कदम यांनी आत्महत्या केली आहे. विद्याविहार रेल्वे स्टेशनच्या ऑफिसमध्ये फाशी लावून त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.


क्रिकेटर सौरव गांगुलीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. २ जानेवारीला सकाळी घरात वर्कआउट करताना गांगुलीला छातीत दुखू लागले. त्याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यामुळे त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. आता गांगुलीची प्रकृती व्यवस्थित आहे.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -