घरट्रेंडिंगकॉंग्रेसच्या विरोधानंतरही CMO कार्यालयाकडून संभाजीनगर नावाने पुन्हा ट्विट

कॉंग्रेसच्या विरोधानंतरही CMO कार्यालयाकडून संभाजीनगर नावाने पुन्हा ट्विट

Subscribe

मुख्यमंत्री कार्यालयाकडून औरंगाबादचे संभाजीनगर असा उल्लेख कायम असतानाच आता पुन्हा एकदा सीएमओ कार्यालयाकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. संभाजीनगरसारख्या मराठवाड्याच्या राजधानी शहरात सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न साकार होणार असून उत्तम रितीने नागरीकरण होऊ शकेल. यापुढे देखील असे जनहिताचे निर्णय घेण्यात येतील त्याकरिता आपले सहकार्य आणि प्रेम असेच राहू द्या असे ट्विट उद्धव ठाकरे यांच्या सीएमओ महाराष्ट्र ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री कार्यालयाकडून औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेखाचे ट्विट दोन दिवसानंतरही cmo ट्विटर हॅण्डलवर कायम आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अजित पवार यांनी या ट्विटबद्दल आपले मत मांडल्यानंतरही हे ट्विट हटवण्यात आलेले नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आक्षेपानंतरही हे ट्विट कायम ठेवल्यामुळे आता नामांतराच्या मुद्द्यावरील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून याआधीच अनेक प्रतिक्रिया समोर येत असताना आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटमुळे या वादात आणखी ठिणगी पडलेली आहे. कॉंग्रसने नामांतराचा मुद्दा मांडत हा विषय किमान समान कार्यक्रमाअंतर्गत मान्य नसल्याचा आक्षेप आधीच नोंदवला आहे.

- Advertisement -

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संबंधित मंत्रीमंडळ निर्णयात सीएमओ ट्विटर हॅंडलवरून परस्पर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता. संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शासकीय महाविद्यालय व कर्करोग रूग्णालय येथे नव्याने १६५ खाटा आणि ३६० पदांच्या निर्मितीस मान्यता देणाऱ्या मंत्रीमंडळ निर्णयात संभाजीनगर नावाचा उल्लेख ट्विटमध्ये होता. या ट्विटवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने आक्षेप घेत टीका केली होती.

काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात ?

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया.

राजकीय पक्षांकडून आल्या प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री अजितदादा यांनीही या ट्विटच्या प्रकरणात कुणी जाणीवपूर्वक गडबड केली का ? हे तपासणार असल्याचे आश्वासन माध्यमांशी बोलताना दिले होते. सरकारी काम करताना त्यामागची पार्श्वभूमी काय आहे हे तपासून पाहू असे त्यांनी सांगितले होते. तर ट्विटर हॅंडल करणाऱ्याकडून चूक झाली असेल तर त्याला समज देण्यात येईल, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी स्पष्ट केले होते. तर भाजपकडून होणाऱ्या टिकेवर बोलताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, भाजपला बोलण्याचा अधिकार नाही. भाजपने मागील पाच वर्षात काही केले नाही. आता संभाजीनगरचा विकास पाहून त्यांना ही बाब खटकत असेल असा टोला त्यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -