घरलाईफस्टाईलMakar Sankranti 2021: मकर संक्रांतीला का उडवली जाते पतंग ?

Makar Sankranti 2021: मकर संक्रांतीला का उडवली जाते पतंग ?

Subscribe

हिंदू सणांपैकी महत्वाचा असलेला मकर संक्रांत हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. जानेवारी महिन्यात आणि हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येणारा महत्त्वपूर्ण सण मानला जातो. यादिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांति म्हटले जाते. या दिवशी सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला ‘मकर संक्रांत’ म्हणतात. मकर संक्रांतीला तीळाचे लाडू करण्याची पद्धत आहे. भूतकाळातील कडू आठवणींना विसरुन तीळ आणि गुळ यांचा गोडवा आयुष्यात यावा असे म्हटले जाते. पण याचा वैज्ञानिक दृष्टीकोण असा आहे की, हिवाळ्याच्या दिवसात तीळ आणि गुळाने शरीराला उब मिळते. म्हणून यादिवसानिमित्त तीळगुळ खाल्ले जातात. परंतु तीळ गुळाप्रमाणे पंतग उडवण्यालाही मकर संक्रांतीत अधिक मह्त्त्व आहे. विशेष म्हणजे लहान मुलांपासून ते तरुण मुले या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. कारण याचं दिवशी त्यांना मनसोप्त पंतग उडवण्याचा आनंद घेता येतो. परंतु असा कधी विचार केलात का, की मकरसंक्रांतीलाच पंतग का उडवली जाते? हीच गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहोत.

 

- Advertisement -

‘या’ कारणासाठी मकरसंक्रांतीला उडवली जाते पंतग 

पतंग हे आनंद, उत्साह, स्वातंत्र्य, आणि शुभ संकेताचे वाहक आहे. मकर संक्रांतीला साऱ्या जुन्या कठू आठवणी विसरुन तीळ-गुळाप्रमाणे गोडवा आणत घरातील शुभ कार्याला सुरुवात केली जाते. हीच शुभ कार्ये पतंगाप्रमाणे सुंदर, निर्मळ आणि उच्च कोटीची झाली पाहिजेत यासाठी पंतग उडवली जाते. अनेक जण कार्याचा शुभारंभ उत्तम व्हावा यासाठी आपल्या देशाच्या तिरंग्या झेंड्याला देखील पतंगाच्या रुपात उडवतात. पतंग उडवल्याने एक वेगळा आनंद मिळत असतो त्यामुळे आपल्या मेंदुचे संतुलन सुधारते. पतंगाला उंच भरारी झेप देत उडवताना कोणतरी कापेल या भीतीने बचाव करण्यासाठी मनुष्याला नवे विचार सुचतात, स्वत;चा बचाव ताकदीने करण्यासाठी एक नवी ऊर्जा मिळत असते यासाठी पंगत उडवण्याची प्रथा वर्षानोवर्षे चालत आली. त्याचप्रमाणे हिवाळ्याच्या दिवसात थंडीपासून वाचाव करण्यासाठी उष्णतेची खूप गरज असते. यासाठीच पतंग उडवायचे असे म्हंटले जाते. तर मकार संक्रांतीला सूर्य देवता प्रसन्न म्हणून देखील अनेक लोक तासंतास उन्हात उभे राहून पतंग उडवतात. याकारणाने शरीराला सूर्याची उष्णता मिळते. आणि ज्यामुळे शरीराला व्हीटामिन डीचे पोषण होते तसेच सर्दी, खोकला यांसारख्या आजारांपासून दूर राहता येते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -