घरमहाराष्ट्रबेळगावातील भीषण अपघातात ११ जण ठार

बेळगावातील भीषण अपघातात ११ जण ठार

Subscribe

गोव्याला जाण्याचा मोह जीवावर बेतला

बेळगावातील धारवाडमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. टेम्पो आणि डंपरमध्ये झालेल्या या अपघातात १० महिलांचा जागीच मृत्यू झाला असून चालकाचाही जागीच मृत्यू झाला आहे. हुबळी-धारवाड बायपास रोडवर शुक्रवारी सकाळी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला समोरुन येणाऱ्या डंपरने धडक दिला. धारवाड शहरापासून ८ कि.मी. अंतरावर असलेल्या इटिग्ट्टी क्रॉसजवळ हा अपघात झाला आहे.

या अपघातात दहा महिला प्रवासी आणि टेम्पोच्या चालकाचा मृत्यू झाला. सहा जखमींना किम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृतक दावणगेरे येथील रहिवासी असून ते फिरण्यासाठी गोव्याला जात होते. कोरोनामुळे मागील १० महिन्यांपासून फिरायला मिळाले नव्हते यामुळे गोवा फिरण्यास १७ महिला निघाल्या होत्या यातील १० महिलांचा मृत्यू झाला आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर बायपास महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

- Advertisement -

अपघातात सामील झालेल्या वाहनांना महामार्गावरून काढून टाकल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. पुणे आणि बंगळुरू दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर हुबळी-धारवाड बायपासची ३२ कि.मी. लांबीची एकमेव लेन आहे. मुंबई आणि चेन्नई औद्योगिक कॉरिडॉर दरम्यानही हा एकमेव मार्ग आहे आणि अपघातांचे साक्षीदार आहे. या मार्गावर रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी सतत केली जात आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -