घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात लोकशाही नाही तर ‘लॉकशाही’; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्रात लोकशाही नाही तर ‘लॉकशाही’; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Subscribe

राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ठाकरे सरकार लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहे. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. महाराष्ट्रात लोकशाही नसून केवळ ‘लॉकशाही’ आहे, असा हल्लाबोल फडणवीस यांनी ठाकरे सरकार केला आहे. तसंच त्यांनी पुन्हा एकदा या सरकारला लबाड सरकार म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी पंढरपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यातील कोरोना परिस्थिती रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळेच उठसूठ लॉकडाऊन केला जात आहे. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात लोकशाही नसून लॉकशाही आहे, अशी घणाघाती टीका केली. कष्टकरी, शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज न देता लॉकडाऊन केला जात आहे. पॅकेजशिवाय करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनला आमचा विरोध आहे, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

समाधान आवताडे यांच्या प्रचारसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सभा घेण्याची सवय गेली आहे. दुर्देवाने ही पोटनिवडणूक लागली आहे. एका मतदारसंघाची ही पोटनिवडणूक असली तरी सरकारचा नाकर्तेपणा दाखवून देण्याची ही संधी मतदारांना मिळाली आहे, असं फडणवीस म्हणाले. पुढे बोलताना फडणवीस यांनी वाढीव वीज बिलावरुन सरकारवर निशाणा साधला. हे सरकार लबाड, फसवं सरकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

राज्याचं विधीमंडळाचं अधिवेशनाच्या सुरुवातीला वीज कनेक्शन कापणार नसल्याचं आश्वासन या सरकारनं दिलं. मात्र, अधिवेशन सुरु झाल्यानंतर वीज कनेक्शन कापायला सुरुवात केली. एखाद्या गावात पाच लोकांनी वीज बिल भरलं नाही तर त्या गावचा ट्रान्सफार्मर काढला जात असून गावांना अंधारात लोटलं जात आहे. त्यामुळे पंढरपूरच्या विकासाचं आश्वासन देणाऱ्या या सरकारला भुलून जाऊ नका, असं आवाहन फडणवीस यांनी केलं. ठाकरे सरकार केवळ लबाड सरकारच नाही तर महावसुली सरकार आहे, असा घणाघात देखील फडणवीस यांनी सरकारवर केला.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -