घरट्रेंडिंगCovid-19 चे लक्षणं असूनही रिपोर्ट Negative; कोरोना टेस्ट करताना घ्या 'ही' काळजी

Covid-19 चे लक्षणं असूनही रिपोर्ट Negative; कोरोना टेस्ट करताना घ्या ‘ही’ काळजी

Subscribe

कोरोनाची दुसरी लाट वयोवृद्ध तसेच तरूणांसाठी देखील जीवघेणी ठरतेय. दिवसेंदिवस देशातील कोरोना बाधितांचा वाढता आकडा अधिक चिंताजनक ठरत आहे. महाराष्ट्र, दिल्लीसारख्या प्रमुख शहरांमध्ये कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आरोग्य अधिकारी नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचे कोरोनाचे लक्षणं दिसल्यास कोरोना चाचणी करण्याचे आवाहन करत आहे. मात्र एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही लोकांमध्ये कोरोनाचे लक्षणं असूनही त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येत आहे. त्यामुळे कोरोना चाचणी करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचे झाले आहे.

कधी कराल कोरोना चाचणी

कोरोनाची सामान्य लक्षणं म्हणजे सर्दी, ताप येणं, अंग दुखणं, कोणतीही चव न समजणं, थंडी वाजणे, श्वास घेण्यास त्रास जाणवणे, डोळे लाल होणे आणि पोटात दुखणे यासह कानाशी संबंधित समस्या. तुमच्यात कोणतीही लक्षणं दिसल्यास त्वरीत कोरोना चाचणी करून घ्या.

- Advertisement -

अशा वेळी टेस्ट करू नका

तज्ज्ञांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला कोरोना लसीच्या दोन्ही डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला असेल आणि त्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत तर रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर देखील त्याने कोरोना टेस्ट करणे आवश्यक नाही.

कोणती टेस्ट कराल

कोरोनासारख्या परिस्थितीत RT-PCR ही टेस्ट सर्वात उत्तम मानली जाते. RAT अर्थात ‘रॅपिड अॅन्टीजन टेस्ट’. ही टेस्ट केल्याने लगेच कोरोनाचा रिपोर्ट समजण्यास मदत होते. ‘रॅपिड अॅन्टीजन टेस्ट’ चा रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल तर कोरोना असल्याचे ग्राह्य मानले जाते. जर रिपोर्ट निगेटिव्ह आला असेल आणि त्या व्यक्तीत जर लक्षणं असतील तर RT-PCR टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो.कोरोनाची लक्षणं दिसताच डॉक्टर काही रूग्णांना छातीचा सीटी स्कॅन करण्याता सल्ला देतात. सीटी स्कॅनमधील सर्वाधिक सीटी स्कोअर हा संक्रमणाचा अधिक धोका दर्शवितो.

- Advertisement -

अशा वेळी कोरोनाचा सर्वाधिक धोका

जर तुम्ही कोणत्याही कोरोना संक्रमित व्यक्तीपासून ६ फूटापेक्षा कमी अंतरावर कमीत कमी १५ मिनिटांपर्यंत संपर्कात असाल, तर तुम्हाला कोरोना होण्याचा धोका सर्वाधिक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे संक्रमित व्यक्तीपासून शक्यतो लांब रहा किंवा घराबाहेर पडताना आपली काळजी घ्या.

जर तुम्हाला कोरोना झाला तर…

जर तुम्हाला कोरोना संसर्ग झाला असेल तर होम क्वारंटाईन किंवा आयसोलेशन वॉर्डमध्ये काही दिवस रहा. लहान मुले, वृद्ध किंवा घरात कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ नका.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -