घरव्हिडिओदुर्घटनेची जबाबदारी भाजपनं घ्यावी

दुर्घटनेची जबाबदारी भाजपनं घ्यावी

Related Story

- Advertisement -

नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनचा टँकर लिकेज झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत रुग्णालयातील २२ रुग्णांचा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्यामुळे तडफडून मृत्यू झाला. मात्र, या घटनेनंतर भाजपने राज्य सरकारला दोषी धरले आहे. परंतु, नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपने या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारायला हवी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केलीय आहे. तसेच या दुर्घटनेनंतर महापौर आणि भाजपचे आमदार फरार झाले का?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला विचारला आहे.

- Advertisement -