घरमहाराष्ट्रपरमबीर सिंग यांची पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडून चौकशी

परमबीर सिंग यांची पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडून चौकशी

Subscribe

गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनुप डांगेंच्या आरोपासंदर्भात चौकशी

पोलीस महासंचालक संजय पांडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी करत आहेत. गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर केलेल्या आरोपांसंदर्भात चौकशी केली जात आहे. परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचार आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींचं टार्गेट दिलं होतं असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. परमबीर सिंग यांच्या खळबळजनक लेटरबॉम्ब नंतर गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी पत्र लिहत परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले होते. परमबीर सिंग यांनी गावदेवी परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या डर्टी बन्स सोबो या पबवर कारवाई केल्याने आधी माझी बदली करण्यात आली. त्यानंतर मला निलंबित केलं. परमबीर यांचे चुलत भाऊ असल्याचे सांगून शार्दुल बायास यांनी बदली थांबवण्यासाठी ५० लाखांची मागणी केली होती. पुढे निलंबन रद्द करून पुन्हा कामावर परत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे २ कोटींची मागणी केल्याचा गंभीर आरोप ही अनुप डांगे यांनी केला.

- Advertisement -

दरम्यान, या आरोपांची आता पोलीस महासंचचालक संजय पांडे चौकशी करत आहे. आज परमबीर सिंग यांची चौकशी करायला संजय पांडे यांनी सुरुवात केली आहे.

अनुप डांगे यांनी काय म्हटलं होतं पत्रात? 

गावदेवी परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या डर्टी बन्स सोबो या पबवर २२ नोव्हेंबर २०१९ रोजी कारवाई केली होती. पबचा मालक जीतू नावलानी याने तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात असलेल्या परमबीर यांच्यासोबत कौटुंबिक संबंध आहेत, असे सांगून कारवाईस विरोध केला होता. त्यानंतर एसीबीच्या कार्यालयातून परमबीर सिंह यांनी भेटण्यासाठी बोलावल्याचा फोन आला होता. पण तेव्हा डांगे भेटायला गेले नाही. पण त्यानंतर परमबीर सिंह मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर अनुप डांगे यांची विभागीय चौकशी सुरू झाली आणि ४ जुलै २०२० रोजी दक्षिण नियंत्रण कक्षात त्यांची बदली झाली आणि नंतर १८ जुलै रोजी डांगे यांचं निलंबन झाल्याचं पत्रात म्हटलं आहे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -