घरक्रीडाIPL 2021 : RCB विरुद्ध दिल्लीची गोलंदाजी; अश्विनच्या जागी ईशांत शर्माला संधी 

IPL 2021 : RCB विरुद्ध दिल्लीची गोलंदाजी; अश्विनच्या जागी ईशांत शर्माला संधी 

Subscribe

दिल्ली आणि बंगळुरू या दोन्ही संघांनी यंदाच्या मोसमात अप्रतिम कामगिरी केली असून पाच पैकी चार सामने जिंकले आहेत.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये सामना होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली आणि बंगळुरू या दोन्ही संघांनी यंदाच्या मोसमात अप्रतिम कामगिरी केली असून पाच पैकी चार सामने जिंकले आहेत. दिल्लीने त्यांच्या मागील सामन्यात सनरायजर्स हैदराबादला पराभूत केले होते. मात्र, या सामन्यानंतर दिल्लीचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने आयपीएलमधून माघार घेतली. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्या जागी वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला दिल्लीने संधी दिली आहे.

- Advertisement -

नवदीप सैनी संघातून बाहेर 

दुसरीकडे बंगळुरूने सलग चार विजयांसह यंदाच्या मोसमाची सुरुवात केली होती. परंतु, मागील सामन्यात त्यांना चेन्नई सुपर किंग्सने पराभूत केले. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी बंगळुरूने संघात दोन बदल केले आहेत. डॅन क्रिस्टियन आणि नवदीप सैनीच्या जागी डॅनियल सॅम्स आणि रजत पाटीदार यांना संघात स्थान देण्यात आले आहे.

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -