घरमुंबईसहकार क्षेत्रातील बँकांमध्ये सारस्वत बँक आदर्श

सहकार क्षेत्रातील बँकांमध्ये सारस्वत बँक आदर्श

Subscribe

सारस्वत बँकेच्या शतकपूर्ती कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,साहित्यिक मधू मंगेश कर्णिकयांनी उपस्थितीत राहून सहकार क्षेत्रातील बँकांमध्ये सारस्वत बँक आदर्श असल्याचे मनोगत व्यक्त केले.

सारस्वत बँकेच्या शतकपूर्ती कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,साहित्यिक मधू मंगेश कर्णिकयांनी उपस्थितीत राहून सहकार क्षेत्रातील बँकांमध्ये सारस्वत बँक आदर्श असल्याचे मनोगत व्यक्त केले. ‘शताब्दी सारस्वत’ आणि ‘आर्थिक व बँकिंग क्षेत्राच्या धोरणाच्या बदलत्या छटा’ या दोन पुस्तकांचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

या सोहळ्यात बँकेच्या दोन नवीन सेवाचे उदघाटन करण्यात आले. सारस्वत बँके 100 डिजिटल अकाऊंट या सुविधेंतर्गत आधार कार्ड क्रमांकाद्वारे येणार्‍या ओटीपीच्या आधारे तीन मिनिटात सेव्हिंग अकाऊंट उघडले जाईल. खाते उघडताना आपल्या सोईनुसार अ‍ॅपद्वारे आपले बँक खाते क्रमाक्र उघडता येणार आहे. याचवेळी सारस्वत बँकेच्या डेबिट कार्डद्वारे ग्राहक कार्डटॅप करून पेमेंट करू शकणार आहेत. याप्रसंगी शरद पवार म्हणाले की, चांगल्या नेतृत्वामुळे सहकार चळवळीत महाराष्ट्राने नवीन दिशा दाखवली.या बँकेने सहकार बँकेला शक्ती दिली आहे. सहकारी बँका या शेवटच्या माणसाला मदत करणार्‍या बँका आहेत. कोकणी माणूस पैसे घेताना दहादा विचार करतो आणि पैसे परत केल्याशिवाय त्याला झोप लागत नाही म्हणून बँकेचा एनपीए शून्य आहे.

- Advertisement -

यावेळी शरद पवारांनी केंद्र सरकारने राष्ट्रीयकृत बँकांना 86 हजार कोटी दिले, पण सहकारी क्षेत्राला केंद्र सरकारने दुसरा दृष्टिकोन दिलेला दिसत नाही अशी टीका केली. १०० वर्षे पूर्ण करणे ही सोपी गोष्ट नाही. ही परिश्रमाची परंपरा, तुम्ही पुढे नेताय. आताची परिस्थिती विचित्र आहे. सगळं विचित्र चाललंय. सारस्वत बँक शिवसेनेच्या मागे उभी राहिली नसती तर सामना सुरू झाला नसता. हत्ती आणि सात आंधळे अशी परिस्थिती आहे. हत्तीवर माहूत म्हणून बसण्याची कुणाची हिंमत नाही. सर्व सामान्यांना कुणी बघायला तयार नाही. त्याला तुम्ही मारलं की मी मारलं यातच सरकार व्यस्त असल्याची टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -