घरताज्या घडामोडीम्युकॉरमायकोसिसचा 'या' इंजेक्शन कोर्सने उपचार शक्य ! २१ दिवसांची उपचार पद्धती

म्युकॉरमायकोसिसचा ‘या’ इंजेक्शन कोर्सने उपचार शक्य ! २१ दिवसांची उपचार पद्धती

Subscribe

देशातील अनेक शहरांमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांच्या निमित्ताने म्युकॉरमायकोसिस (𝐌𝐮𝐜𝐨𝐫𝐦𝐲𝐜𝐨𝐬𝐢𝐬) हा काळ्या बुरशीचा आजार आता थैमान घालत आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि गुजरात येथे या आजाराचे रूग्ण सापडत आहेत. गेल्या तीस वर्षांमध्ये काळ्या बुरशीचा आजार हा पहिल्यांदाच आढळून आला आहे. देशात कोरोनावर उपचारा दरम्यान ऑक्सिजन, आयसीयू बेड, एम्ब्युलन्स अशा अनेक गोष्टींचा तुटवडा जाणवत असतानाच आता आणखी एका नव्या समस्येची भर पडली आहे. या म्युकॉरमायकोसिसच्या उपचारासाठीच्या इंजेक्शनसाठी रूग्णांच्या नातेवाईकांची आता तारांबळ उडाली आहे. अनेक मेडिकल स्टोअर्समध्ये या काळ्या बुरशीच्या उपचारासाठी रूग्णांचे नातेवाईक पळापळ करत आहेत. त्यामुळेच जशा प्रकारे रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला होता, त्यानुसारच म्युकॉरमायकोसिसच्या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.

किती दिवसांचा आणि किती महागडा आहे उपचार ?

म्युकॉरमायकोसिसचा उपचार अतिशय महागडा आहे. म्युकॉरमायकोसिसच्या उपचारासाठी एम्फोसिन – बी हे इंजेक्शन दिले जाते. उपचारादरम्यान १५ ते २१ दिवसात इंजेक्शन दिले जाते. गरज भासल्यास दुर्बिणीच्या माध्यमातून नाकातील बुरशी हटवण्यासाठी सर्जरीही केली जाते. पण या शस्त्रक्रियेतही इंजेक्शन द्यावे लागते. या उपचारासाठी रुग्णाला प्रत्येक दिवशी ६ ते ९ इतक्या मोठ्या प्रमाणात इंजेक्शन दिले जाते. एम्फोसिन – बी या एका इंजेक्शनची किंमत साधारणपणे ६ हजार ते ७ हजार इतकी असते. जवळपास २० ते २८ दिवस चालणाऱ्या उपचारासाठी इंजेक्शनचा खर्च हा १३ लाख रूपये ते १४ लाख रूपये इतका येतो.

- Advertisement -

कुठे वाढताहेत प्रकरणे ?

दिल्लीमध्ये म्युकॉरमायकोसिसच्या आजाराची प्रकरणे ही दिल्लीत आढळली आहेत. गुजरातमध्ये राजकोट आणि सौराष्ट्रातही या आजाराचे रूग्ण वाढत आहेत. त्याचाच भाग म्हणून राजकोट येथे २५० बेड्सचे म्युकॉरमायकोसिस वॉर्ड निर्माण करण्यात आला आहे. या दोन भागातील वाढती प्रकरणे पाहता हा वॉर्ड निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच कोरोनावर नियमित उपचार घेणाऱ्या रूग्णांना स्थलांतरीत करून त्याठिकाणी वॉर्ड निर्माण करण्यात आला आहे. या आजारावर रूग्णांना दाखल करण्यात आल्यानंतरही इंजेक्शनचा वापर करणे महत्वाचे आहे. इंफेक्शनमध्ये सर्जरी झाल्यानंतरही इंजेक्शनचा वापर गरजेचा आहे. इंजेक्शनचा वापर हा अधिक होत असल्यानेच गुजरात सरकारद्वारे या उपचारासाठी १ कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री रूपाणी यांच्या अध्यक्षतेत या आजारावर नियंत्रणासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याशिवाय एम्फोटेरिसिन बी ५० एमजी ही पाच हजार इंजेक्शन खरेदीचेही आदेश देण्यात आले आहेत.

काय आहेत लक्षणे ?

या विषारी बुरशीमुळे परिणामी नाक, डोळ्यांभोवती सूज येते तसेच डोळेही लाल होतात. त्यासोबतच ताप, डोकेदुखी, कफ, श्वास घेण्यासाठी त्रास होणे, रक्त्याच्या उलट्या होणे आमि मनासिक स्थिती बदलत राहणे यासारखे परिणाम होतात.

- Advertisement -

परिणाम का होतो ?

मधुमेह अनियंत्रित होण्यावर परिणाम
स्टेरॉईड्समुळे रोग प्रतिकारक शक्तीवर प्रभाव
सहव्याधींमुळे वाढ होणे

कसा प्रतिबंध कराल ?

– जर तुम्ही धुळीच्या संपर्कात किंवा त्यासारख्या कामाच्या ठिकाणी जात असाल तर मास्कचा वापर करा
– मातीमध्ये काम करत असाल तर पायात बूट, मोठी पॅंट आणि शर्ट, हातमोज्यांचा वापर करा
– वैयक्तिक स्वच्छता ठेवतानाच अंग घासून अंघोळ करणे गरजेचे आहे.

कधी तपासणी कराल ?

– नाक बंद होणे, नाक खूपच गळणे, नाकातून काळ रक्त आल्यावर, नाकाचा शेंडा दुखू लागल्यावर
– चेहऱ्याच्या एकाच बाजुला दुखू लागणे किंवा सूज वाढल्यावर
– नाकावर काळे दिसून लागणे
– दात दुखणे, दात पडणे, जबडा दुखणे
– डोळ्यांना धूसर दिसणे किंवा डोळे दुखणे, ताप येणे
– छातीत दुखणे, श्वास घेण्यासाठी अडथळे निर्माण होणे

काय करावे ? (Do’s)

– हायपरग्लायसेमिया नियंत्रणात ठेवावा
– कोरोनामुक्तीनंतर तुमच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण तपासा
– मधुमेह असेल तर रक्तातील ग्लुकोज तपासत रहा
– स्टेरॉईड्सचा वापर आवश्यक तितकाच करा, त्यामध्ये योग्य वेळ, योग्य डोस आणि कालावधी असावा
– ऑक्सिजन थेरिपिमध्ये स्वच्छ आणि स्टराईल केलेल्या पाण्याचा वापर करा
– एन्टीबायोटिक्स आणि एन्टीफंगल्सचा वापर नियंत्रित पद्धतीने करा

काय करू नये ? (Don’t)

– सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
– नाक बंद होण्याची सर्व प्रकरणे ही विषाणूमुळे झालेली असतील अशी समजूत ठेवू नका
– ज्यांना कोरोनाची लागण होऊ न गेली आहे अशा व्यक्तींना या लक्षणांवर अधिक लक्ष ठेवणे गरजेचे आहे
– KOH स्ट्रेनिंग, मायक्रोस्कोपी, कल्चर, MALDI-TOF यासारख्या बुरशीच्या चाचण्यांचा वापर करा
– म्युकॉरमायकोसिसवर उपचार करण्याचा महत्वाचा वेळ गमावू नका

कसे नियंत्रण मिळवाल ?

– मधुमेह नियंत्रित ठेवा
– स्टेरॉईड्सचा वापर कमी करा
– इम्युनोमॉड्युलेटिंग ड्रग्जचा वापर बंद करा
– अॅन्टीफंगल प्रोफिलॅक्सिसचा वापर टाळा
– अॅन्टीफंगल थेरपीचा ४ ते ६ आठवड्यांचा उपचार घ्या

 


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -