घरक्रीडावडिलांच्या निधनानंतर प्रशिक्षक शास्त्रींच्या पाठिंब्यामुळे सिराज थांबला ऑस्ट्रेलियात

वडिलांच्या निधनानंतर प्रशिक्षक शास्त्रींच्या पाठिंब्यामुळे सिराज थांबला ऑस्ट्रेलियात

Subscribe

कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच काही दिवस सिराजच्या वडिलांचे निधन झाले होते.

भारतीय संघ मागील वर्षीच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजसाठी हा दौरा खास ठरला होता. या दौऱ्यात त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली होती आणि त्याने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या पहिल्याच सामन्यात दोन डावांत मिळून ७७ धावांत ५ विकेट घेतल्या होत्या. परंतु, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच काही दिवस सिराजच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाहून मायदेशी परतण्याचा विचार करत होता. परंतु, भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याला पाठिंबा दिला, त्याच्याशी संवाद साधला. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियात थांबण्याचे बळ मिळाले, असे स्वतः सिराजने एका मुलाखतीत सांगितले.

शास्त्रींच्या पाठिंब्यामुळे आत्मविश्वास वाढला

तू कसोटी सामना खेळ, बघ तुला पाच विकेट काढण्यात यश येईल. तुझ्या वडिलांच्या शुभेच्छा तुझ्या सोबत आहेत, असे प्रशिक्षक शास्त्री यांनी सिराजला पदार्पणाच्या सामन्याआधी सांगितले. पदार्पणाच्या सामन्यात दोन डावांत मिळून सिराजला ७७ धावांत ५ विकेट घेण्यात यश आले. त्यानंतर पुन्हा शास्त्री यांनी सिराजसोबत संवाद साधला. शास्त्री सर खूप खुश होते. तुला मी सांगितले होते ना की तू पाच विकेट घेशील, असे ते मला म्हणाले. त्यांच्या पाठिंब्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला, असे सिराजने सांगितले.

- Advertisement -

संपूर्ण संघानेच धीर दिला

वडिलांच्या निधनानंतर केवळ प्रशिक्षक नाही, तर संपूर्ण संघानेच सिराजला धीर दिला. विराट मला नेहमीच पाठिंबा देतो. मला दोन वर्षांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून चांगली कामगिरी करता आली नव्हती. परंतु, त्याने माझ्यावर विश्वास कायम ठेवला. माझ्या वडिलांच्या निधनानंतर विराटने, प्रशिक्षक शास्त्री सर आणि गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरूण सर यांना मला धीर दिल्याचे सिराज म्हणाला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -