घरताज्या घडामोडीकाँग्रेस स्वतंत्र लढल्यास दोन पक्ष सोबत लढतील, जयंत पाटील यांचे सूतोवाच

काँग्रेस स्वतंत्र लढल्यास दोन पक्ष सोबत लढतील, जयंत पाटील यांचे सूतोवाच

Subscribe

भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणं हे देशाच्या हिताचं

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानाच्या अग्रलेखात भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित लढेल अस वक्तव्य केलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्षाचा समावेश आहे. यातील घटक पक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडून स्वबळाचा नारा अजूनही देण्यात आला नाही यामुळे हे दोन पक्ष एकत्रित लढतील असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

एकत्र राहण्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे – जयंत पाटील

महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत या तीन्ही पक्षांनी एकत्रित राहावं यासाठी सगळ्यांनीच प्राधान्य दिले पाहिजे. त्यातून एखाद्या पक्षाला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उर्वरित २ पक्ष नक्की एकत्रित राहतील असे सामानातून मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रातील लोकांचेही तसच मत दिसत असल्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

स्वबळाचं अजीर्ण झालं – संजय राऊत

राज्यात स्वबळाचं अजीर्ण झालं आहे. हल्ली भाजपकडून सांगितले जात आहे की, आम्ही स्वबळावर लढू काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घोषणा केली आहे की, स्वबळावर लढू परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सागण्यात आलं नाही की आम्ही स्वबळावर लढू त्यामुळे भविष्यात हे दोन पक्ष एकत्रित लढलो तर राज्यात चमत्कार होईल.

योग्य वेळी योग्य निर्णय – भुजबळ

राज्याती महाविकास आघाडी एकत्रित लढेल असं राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, काँग्रेस स्वबळावर लढली तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढेल परंतु अजून वेळ आहे. निवडणूकीला ३ वर्षांपेक्षा जास्त काळ आहे. यामध्ये सर्व पक्ष एकत्र येतील आणि शरद पवार म्हणतात तसेच सगळे सोबत लढतील असे मत अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

सत्तेत येणं प्रत्येक पक्षाचं उद्दिष्ठ – थोरात

प्रत्येक पक्षाचा अधिकार असतो की, आपला पक्ष वाढविणे स्वतःच्या बळावर सत्तेत येणं प्रत्येक पक्षाचं उद्दिष्ठ असते त्यामुळे काही वावगं आहे असं मत नाही. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणं हे देशाच्या हिताचं असल्याचे मत काँग्रेसचं आहे. यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असे काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -