घरताज्या घडामोडीराज कुंद्राची कंपनी पॉर्न व्हिडिओ लंडनला पाठवायची, मुंबई गुन्हे शाखेकडून खुलासा

राज कुंद्राची कंपनी पॉर्न व्हिडिओ लंडनला पाठवायची, मुंबई गुन्हे शाखेकडून खुलासा

Subscribe

कालकारांना छोटे मोठे रोल देऊन त्यांना बोल्ड सीन करावे लागतील अशा प्रकारे सांगितले जात होते.

उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न फिल्म चित्रीकरण करुन विकल्याच्या आरोपावरुन मुंबई पोलीस गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबईत फेब्रुवारी २०२१ मध्ये मालवणी पोलीस स्टेशन अंतर्गत पॉर्न फिल्मच्या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. पॉर्न फिल्मच्या संदर्भातील तपासामध्ये मुंबई गुन्हे शाखेने पत्रकार परीषदेत या पॉर्न फिल्मच्या रॅकेटबाबत खुलासा केला आहे. चित्रपटात काम करणाऱ्या नवोदित महिला कलाकरांना वेबसिरीजमध्ये किंवा शॉर्ट्स स्टोरीमध्ये काम देतो असे आमिष दाखवून महिला कलाकरांना बोलवले जात होते. यामध्ये कालकारांना छोटे मोठे रोल देऊन त्यांना बोल्ड सीन करावे लागतील अशा प्रकारे सांगितले जात होते. परंतू या बोल्ड सीनचे पर्यावसण हे सेमी न्यूड आणि न्यूड सीनमध्ये व्हायचे ज्यामध्ये महिला कलाकार आक्षेप घ्यायच्या यातील काही महिला कलाकरांनी गुन्हे शाखेमध्ये तक्रार केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या तपासानुसार असे आढळले की, छोट्या फिल्म, स्टोरीज, छोटे शॉर्ट्स तयार करुन काही वेबसाईट आणि काही मोबाईल अॅप्सला विकल्या जात होत्या, या प्रकरणात राज कुंद्रा यांच्यासह ९ जणांना अटक करण्यात आली आहे. प्रोड्यूसर रोवा खान, गेहना वशिष्ट, तन्वीर हाश्मी, उमेश कामत यांच्यासह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी वेगवेगळ्या अॅप्सवर तयार करुन ठेवलेले व्हिडिओ विकायचे आणि त्या वेबसाईटला नोंदणीपक्रियेने व्यवहार केला जायचा.

- Advertisement -

राज कुंद्राचे लंडन कनेक्शन

तपासामध्ये निष्पन्न झाले की, उमेश कामत हा राज कुंद्रा यांच्या कंपनीत भारतातील काम पाहायचा त्याचा अधिक तपास केला असता असे कळाले की, राज कुंद्राची विहान नावाची कंपनीचे एका केंब्रिन नावाच्या कंपनीशी व्यवहार होता ही कंपनी लंडनमध्ये आहे. राज कुंद्राच्या बहीणीचा नवरा त्या कंपनीचा मालक आहे. या कंपनीचंच हॉट शॉट नावाचं अॅप आहे. कंपनी लंडनमध्ये असली तरी या अॅपचे सर्व कंटेंट आणि अॅपचा कारभार मुंबईतील विहान कंपनीतून चालत होता. सखोल चौकशीमध्ये राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीबाबत इमेल, वॉट्सअप ग्रुप सापडले आहेत. आर्थिक व्यवहाराची माहिती सापडली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कंपनीवर छापा टाकण्यात आला यामध्ये सर्व पुरावे सापडले आहेत. या पुराव्यानुसार राज कुंद्रा आणि त्यांचे आयटी हेड रायन यांना सोमवारी रात्री अटक केली आहे.

हॉट शॉट नावाच्या अॅपमध्ये पोर्नोग्राफिक कंटेंट असल्यामुळे अॅपलने २०१९ मध्ये काढून टाकले तर त्यानंतर गुगलनेही ते अॅप काढून टाकले असल्याचे मुंबई गुन्हे शाखेने सांगितले आहे. यापुढेही इलेक्ट्रॉनिक पुरावे, कागदपत्रांच्या पुराव्यानुसार तपास करण्यात येणार आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -