घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: बाधितांची संख्या कोरोनामुक्त रुग्णांपेक्षा मोठी; १६५ जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update: बाधितांची संख्या कोरोनामुक्त रुग्णांपेक्षा मोठी; १६५ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के एवढे आहे. 

महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित आणि मृतांच्या संख्येत किंचित वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच बुधवारी बाधितांची संख्या कोरोनामुक्त रुग्णांपेक्षा मोठी होती. बुधवारी ८ हजार १५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६२ लाख ३७ हजार ७५५ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९४ हजार ७४५ इतकी झाली आहे. तसेच आज ७ हजार ८३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,०८,७५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के एवढे झाले आहे.

१६५ जणांचा मृत्यू   

मंगळवार पाठोपाठ बुधवारीही कोरोनाबाधित मृतांच्या संख्येत किंचित वाढ झाली. मंगळवारी १४७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता, तर बुधवारी १६५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी मुंबईत १३, ठाण्यात १, ठाणे मनपामध्ये २, नवी मुंबईत २ आणि रायगडमध्ये ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत १ लाख ३० हजार ९१८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

३७९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 

राज्यात आज ८ हजार १५९ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६०,६८,४३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,३७,७५५ (१३.५४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५१,५२१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ३७९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -