घरक्रीडाTokyo 2020 : चक दे इंडिया! ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारतीय महिला हॉकी...

Tokyo 2020 : चक दे इंडिया! ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक

Subscribe

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. महिला हॉकी संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत उपांत्य फेरीत धडक दिली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला उपांत्य पूर्व सामन्यात १-० च्या फरकाने धूळ चारली. ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये इतकी चमकदार कामगिरी केली आहे.

भारतीय महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियावर १-० ने दणदणीत विजय मिळवत ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. सामना सुरु झाल्यानंतर पहिल्याच क्वार्टरमध्ये भारताच्या शर्मिला देवीला दुखापत झाल्याने मैदानाबाहेर जावं लागलं. दरम्यान, पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. मात्र, दुसऱअया क्वार्टरमध्ये भारताच्या गुरजीत कौरने पेनल्टी शॉर्टवर गोल करत भारताचं खातं उघडलं. या गोलसहीत पहिल्या हाफमध्ये भारताने १-० ची आघाडी मिळवली. भारताने ही आघाडी कायम ठेवत उपांत्यफेरीतील प्रवेश निश्चित केला. या सामन्यात भारताने ७ पेनल्टी कॉर्नरचा यशस्वी बचाव केला.

- Advertisement -

उपांत्य सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी भारतीय संघाने आर्यलड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची किमया साधली होती.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -