घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री नावाप्रमाणे महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला निघालेत - नारायण राणे

मुख्यमंत्री नावाप्रमाणे महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला निघालेत – नारायण राणे

Subscribe

भाजपची सत्ता येणार हाच संदेश द्यायला जन आशीर्वाद यात्रा

महाराष्ट्राची जनता आता सरकारला कंटाळली आहे. हे सरकार राज्याचा विकास करू शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नावाप्रमाणेच उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला निघालेल्या सरकारला सांगुयात की आता तुमचा काळ संपला आहे. आता भाजप सत्तेत येणार आहे, अशी तुमचा काळ संपला आहे, अशी टीका नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. लवकरच महाराष्ट्रातील जनतेला सुखाचे समाधानाचे दिवस पहायला मिळतील असेही आश्वासन राणेंनी दिले. मुंबईत जन आशीर्वाद यात्रेसाठी नारायण राणे बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला.

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. राज्यात इतर ठिकाणी मंत्र्यांची आधीच जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे. परत भाजपची सत्ता यावी म्हणून या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात जनता उपस्थित आहे. गर्दी भरपूर करा, पण कोरोनाचे नियम पाळा असेही राणे म्हणाले. आपण महाराष्ट्राला वाचवायला निघालो आहोत. त्यामुळेच महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला निघालेल्या लोकांना संदेश देऊयात. तुमचा काळ आता संपला आहे. भाजपची सत्ता महाराष्ट्रात येऊन आता गोरगरीब तरूणांना रोजगार मिळू शकतील आणि प्रगतीकडे वाटचाल करता येईल यासाठी प्रयत्न करूयात असेही राणे म्हणाले.

- Advertisement -

मला कॅबिनेट मंत्रीपद मिळून आता दीड महिन्याचा काळ झाला. दिल्लीच्या मंत्रीमंडळ बैठकीत आतापर्यंत अतिशय वेगळा अनुभव आला आहे. मंत्रीमंडळ बैठकीत बसताना वाटत होत की आता देवेंद्र फडणवीस दिसतील, आता प्रवीण दरेकर दिसतील, आशीष दिसेल असे वाटत होते. पण देवेंद्रजींनी आता मला केंद्रीय मंत्रीमंडळात पाठवले याची जाणीव होऊ लागली आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेचे पद आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे महाराष्ट्राच्या जनतेचे पद मला मिळाले आहे. या विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा विकास करता येईल. रोजगार निर्माण करता येईल, देशाला विकासाकडे घेऊन जाता येईल यासाठी माझे प्रयत्न असतील. हा देश जीडीपीमध्ये अन्य देशाच्या तुलनेत आघाडीवर असावा हे माझे प्रयत्न असणार आहे. महाराष्ट्राचे नाव दिल्लीत केल्याशिवाय राहणार नाही असेही राणे म्हणाले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -