घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकंट्रोलरूम खाक; राहात्यात ८७ लाखांचं नुकसान

कंट्रोलरूम खाक; राहात्यात ८७ लाखांचं नुकसान

Subscribe

प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीमधील घटना

राहाता तहसील कार्यालयासाठी कार्यान्वित ऑनलाइनप्रणाली कंट्रोल रूमला रविवारी (दि.२६) रात्री आग लागली. या दुर्घटनेत सुमारे ८७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. राहाता तालुका प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीत महानेटच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालय ऑनलाइन जोडणी नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे.

आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून विविध उपकरणे जळून खाक झाले आहेत. सुदैवाने आग इतरत्र न पसरता वेळीच विझवल्याने पुढील अनर्थ टळला. अन्यथा इमारतीतील महसूल, पंचायत समिती, कृषी विभाग यासह अनेक कार्यालय आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून मोठी वित्त हानी झाली असती.राहाता तहसील कार्यालयात गेल्या तीन ते चार महिन्यापासून कार्यालयातील एका रूममध्ये महानेटच्या माध्यमातून सर्व डिजिटल मशनरीद्वारे ऑनलाईन उपकरणे बसविण्याचे काम सुरू होते. राहाता तालुक्यातील जवळपास ३० ग्रामपंचायतींसाठी ऑनलाइन करण्याचे काम पूर्ण झाले होते. तर २० ग्रामपंचायतीचे काम अंतिम टप्प्यात सुरू असल्याने पुढील १ ते २ महिन्यात संपूर्ण काम पूर्ण होऊन राहाता तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीचे कामकाज ऑनलाइन सुरू होणार होते. त्यासाठी राहाता येथील तहसील कार्यालयात एक कंट्रोल रूम बनवून या रूममध्ये सुमारे १ कोटी रुपये किमतीचे साहित्य बसविण्यात आले होते. रविवारी रात्री राहाता शहरात मुसळधार पाऊस झाल्याने ही शॉर्टसर्किटची घटना घडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

- Advertisement -

राहाता तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नसल्याने नेमकी आग कशामुळे लागली याबाबतचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या आगीमध्ये १५ लाख रुपये किमतीच्या दोन राउटर रॅक, ४ लाख रुपये किमतीची एक एम. डी. एम. एस. केबल, १ लाख रुपये किमतीचे बॉक्स, ५ लाख रुपये किमतीच्या 21 बॅटरी, ६० लाख रुपये किमतीचे २ नेटवर्क राऊटर तसेच २ लाख रुपयांच्या किरकोळ वस्तू असे एकूण ८७ लाख रुपये किमतीच्या वस्तूचे नुकसान झाल्याचा पंचनामा राहाता येथील तलाठी शिरोळे यांनी केला आहे. इतकी महत्त्वाची कार्यालये एकाच छताखाली असलेल्या प्रशासकीय इमारतीला खर्‍या अर्थाने रात्रीच्या पहारेकर्यांची गरज आहे. मात्र या ठिकाणी रात्रीचा पहारेकरी नव्हता. कदाचित पहारेकरी असता तर वित्तहानी टळली असती.

शॉर्टसर्किटने आग लागून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून संबंधितांना फिर्याद दाखल करण्यास सांगितले आहे. चौकशीदरम्यान आगीचे कारण स्पष्ट होईल. तहसील कार्यालयाचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू व्हावे, यासाठी तत्काळ वीजपुरवठा सुरळीत केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -