दिवाळीनंतर लग्नाच्या सनई वाजायला सुरुवात होते. बॉलीवूड क्षेत्रातही लग्नसराईला सुरुवात झाली आहे. बॉलिवूडमधील नुकतेच राजकुमार राव-पत्रलेखा आणि अनुष्का रंजन-आदित्य सील यांचा विवाहसोहळा पार पडला. विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नाची तयारी सुरू असून, पुढच्या आठवड्यात लग्न होणार आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची चर्चाही सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. बॉलीवूडची रज्जो अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हीसुद्धा लग्नाच्या बेडीत अडकण्याच्या चर्चा सुरु आहेत. छोट्या पडद्यावर गाजलेली आणि आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी ‘नागिन’ फेम अभिनेत्री मौनी रॉय लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मौनी दुबईचा उद्योगपती आणि बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्न करणार आहे. मौनी रॉय देशात नाही तर परदेशात लग्न करणार आहे. मौनी आणि सूरज डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. त्यामुळेच दोघांचे लग्न दुबई किंवा इटलीला होणार आहे. लग्नानंतर ते ‘कूचबिहार’ मध्ये रिसेप्शनही ठेवणार आहेत.
View this post on Instagram
हा लग्नसोहळा २७ जानेवारीला होणार असून, त्यापूर्वी २५ आणि २६ तारखेला विवाहपूर्व विधी पूर्ण होतील. सूरज नांबियार हा बँकर आहे, जो दुबईत राहतो. मात्र, अद्याप सूरज आणि मौनीने लग्नाबाबत काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. अभिनेत्री मौनी रॉय तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कमी बोलते. त्यामुळेच तिने आजपर्यंत लग्नाबाबत काहीही सांगितले नाही.
View this post on Instagram
‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री मौनीला ‘नागिन’ फेम म्हणूनच जास्त ओळखले जाते. लवकरच ती आलिया आणि रणवीर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे.