घरCORONA UPDATEMolnupiravir : भारताला कोरोना विरोधात लढण्यासाठी मिळालं अजून एक हत्यार

Molnupiravir : भारताला कोरोना विरोधात लढण्यासाठी मिळालं अजून एक हत्यार

Subscribe

भारतात कोरोनाविरोधात लढण्यासाठी अजून एक हत्यार सापडले आहे. कारण ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सोमवारी Molnupiravir या अँटी व्हायरस औषधाच्या आपातकालीन वापराला मंजुरी दिली आहे. यामुळे कोरोनावर उपचार करण्यासाठी आता या औषधाचा वापर केला जाणार आहे. Merck या अमेरिकन फार्मा कंपनीने हे औषध तयार केले असून भारतात याचे उत्पादन घेतले जाणार आहे.

स्ट्राइड्स फार्माने मंगळवारी सांगितले की, Molnupiravir या औषधाला मंजुरी मिळाल्यानंतर हे औषध बाजारात लाँच केले जाईल. भारतातील आणखी सहा कंपन्या या औषधाचे जेनेरिक वर्जन आणण्यासाठी तयार आहे.

- Advertisement -

Molnupiravir हे औषध कोरोनावर प्रभावी ठरतेय. तर रुग्णालयात भरती होणाऱ्या आणि मृत्यूच्या जवळ पोहचलेल्या रुग्णांचा धोका या औषधामुळे कमी होतोय. रुग्णांना या औषधाचा २०० एमजीचा एक डोस आठवड्यातून ५ दिवस घ्यावा लागेल. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांनी हे औषध घ्यावे. वयस्कर आणि गंभीर रुग्णांवरचं याचा वापर होणार असून गर्भवती महिलांना वापर केला जाणार नाही.

लवकरचं बाजारात उपलब्ध होईल औषध

DGCI ने आत्तापर्यंत स्ट्राइड्स, डॉ. रेड्डीज, सन फार्मा, सिप्ला, हीटेरो, टोरेंटे आणि ऑप्टीमससह १३ कंपन्यांना औषध निर्मिती आणि विक्रीला परवानगी दिली आहे. या कंपन्या आपल्या ब्राँडच्या नावाने देशभरात औषधांची विक्री करु शकतात.

- Advertisement -

या वर्षाच्या सुरुवातीला या कंपनीने भारतासह जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये Molnupiravir औषधांचे उत्पादन आणि विक्रीसाठी Mercks कंपनीशी डील केली आहे.

केंद्राने Molnupiravir ला परवानगी दिल्यानंतर स्ट्राइड्स फार्मा कंपनीने सांगितले की, कंपनी ब्राँड नेम stripiravir नावे हे औषध भारतात लाँच करणार आहे. तर डॉ. रेड्डीज हे औषध Molflu आणि सन फार्मा हे औषध Molxvir नावे लाँच करणार आहे.


Coronavirus : खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -