घरताज्या घडामोडीWeather alert: राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Weather alert: राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण दिसत आहे. त्यामुळे राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाचा अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. सध्या तिथे कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झाल्याचे त्याचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांसोबत महाराष्ट्रावरही होणार आहे.

महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ वातावरण तयार झालं आहे. आज दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि पुढील तीन दिवसांत दक्षिण कोकणात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु ढगाळ वातावरणामुळे आंबा आणि काजू पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदार सध्या चिंतेत आहे. विदर्भ, मराठवा़ड्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. त्यामुळे त्या भागात माठाची मागणी वाढत आहे.

- Advertisement -

भंडारा जिल्ह्यातील पालंदूर गावात तयार होणारे माठ थेट जिल्ह्याच्या बाहेर जात आहेत. विदर्भातही माठाची मागणी वाढली आहे. दुसरीकडे कमालीची उष्णता वाढल्यामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे नागरिकांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं जात आहे.

उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार असून, काही ठिकाणी हलका ते मध्यम व काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

- Advertisement -

हेही वाचा : Hindu Girl Murder In Pakistan: पाकिस्तानात १८ वर्षीय हिंदू मुलीची भररस्त्यात हत्या


mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -