घरक्रीडास्मृती मंधानाचा बांग्लादेशविरुद्ध मोठा विक्रम, मिताली आणि हरमनप्रीत कौरच्या क्लबमध्ये एंट्री

स्मृती मंधानाचा बांग्लादेशविरुद्ध मोठा विक्रम, मिताली आणि हरमनप्रीत कौरच्या क्लबमध्ये एंट्री

Subscribe

भारतीय महिला क्रिकेट संघातील सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाने आयसीसी महिला विश्व चषक २०२२ मध्ये बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात मोठा विक्रम केला आहे. डावखुरी फलंदाज मंधानाने आपल्या १७ धावा पूर्ण करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा विक्रम करणारी मंधाना भारतातील तिसरी खेळाडू ठरली आहे. यापूर्वी कर्णधार मिताली राज आणि अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरने ५ हजार धावांचा आकडा पार केला आहे.

हॅमिल्टनच्या सेडन पार्क मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या महिला विश्व चषक २०२२ च्या २२ व्या सामन्यात स्मृती मंधानाने ५१ चेंडूंवर ३० धावांचा डाव केला. या डावात तिने ३ चौकार मारले. भारतीय कर्णधार मिताली राजने नाणे फेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती आणि शेफाली वर्माने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. शेफाली आपल्या अर्धशतकापासून ८ धावा दूर राहिली आहे. तिने ४२ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार मारत ४२ धावा केल्या आहेत. कर्णधार मिताली राजला आपले खातंही खोलता आले नाही.

- Advertisement -

भारताची स्टार खेळाडू स्मृती मंधानाच्या नावे ७० एकदिवसीय सामन्यात एकूण २७१७ धावांची नोंद झाली आहे. कसोटी सामन्यात मंधानाच्या नावे ३२५ धावांची नोंद आहे. ८४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सलामीवीर फलंदाजने १९७१ धावा केल्या आहेत. मंधाना एकदिवसीय सामन्यात एकूण ६ तर तर कसोटी सामन्यात शतक पूर्ण केले आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात तिचा बेस्ट स्कोर हा ८६ धावांचा आहे.

सध्याच्या विश्व चषकात मंधना उत्कृष्ट फलंदाजी करत आहे. मंधानाने सुरु असलेल्या विश्व चषकात ६ सामन्यात २५० धावा केल्या आहेत. तिचा बेस्ट स्कोर १२३ धावांचा राहिला आहे. एक शतक आणि एक अर्धशतकही पूर्ण केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : IPL 2022: बंगळुरू आणि पंजाब कधीच चॅम्पियन झाले नाहीत पण खेळाडू घडवण्यात अव्वल; कोलकाता पूर्णतः फ्लॉप

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -