घरक्रीडाICC Women World Cup: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, अष्टपैलू एलिस पेरी वेस्ट इंडिजविरुद्धच्या...

ICC Women World Cup: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, अष्टपैलू एलिस पेरी वेस्ट इंडिजविरुद्धच्या उपांत्य फेरीतून बाहेर

Subscribe

आयसीसी महिला विश्वचषक २०२२ मध्ये आतापर्यंत अजिंक्य ठरलेला ऑस्ट्रेलियन संघ उपांत्य फेरीच्या तयारीसाठी सराव करत आहे. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघामध्ये उपांत्य फेरीचा पहिला सामना उद्या(बुधवार) होणार आहे. मात्र, महत्त्वाच्या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीला उपांत्य फेरीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

काय आहे नेमकं कारण?

ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगने पेरीच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे. अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी पाठीच्या दुखण्यामुळे या सामन्यातून बाहेर पडली आहे. दुखापती झाल्यानंतर पेरीने आपल्या फिटनेसवर काळजी घेण्यास सुरूवात केली होती. मात्र, अद्यापही ती पूर्णपणे फिट नसल्यामुळे तिला संघातून बाहेर करण्यात आलंय.

- Advertisement -

पेरी याआधी २०२० च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतून आणि अंतिम फेरीतून बाहेर पडला होती. कारण त्यावेळी तिला स्नायूंची दुखापत झाली होती. यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान तिला पाठीची दुखापत होत आहे. तसेच ती पूर्णपणे फिट नसल्यामुळे सामन्यातून बाहेर पडली आहे.

पेरीने काल सोमवारी नेटमध्ये सराव केला होता आणि तिला थोडे बरे देखील वाटले होते. परंतु आताच्या सामन्यानुसार ती पूर्णपणे त्या आकारात आणि खेळण्याच्या भावनेत ती दिसत नव्हती,असं मेग लॅनिंग म्हणाली.

- Advertisement -

ही संघासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. पण आता एक दुसरा पर्याय म्हणून आमच्याकडे चांगली कल्पना आहे. तसेच त्याचा वापर आम्ही उद्या करणार आहोत, असं ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने सांगितलं.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने या विश्वचषकात लीग टप्प्यातील सहा सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आणखी दोन सामने जिंकून सातव्या विजेतेपदाच्या शोधात आहे.


हेही वाचा : प्रवीण दरेकरांना मोठा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे निर्देश


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -