बांगलादेशचा यष्टीरक्षक मुशफिकूर रहीमने नवा विक्रम केला आहे. त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात २१९ धावांची खेळी केली. बांगलादेशच्या फलंदाजाने केलेली ही कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
शाकिबचा विक्रम मोडला
बांगलादेशसाठी कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रम शाकिब उल हसनच्या नावावर होता. शाकिबने २०१७ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध २१७ धावांची खेळी केली होती. त्या सामन्यात मुशफिकूर रहीमने १५९ धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत रहीमने ४२१ चेंडूंत १८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २१९ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे बांगलादेशने पहिल्या डावात ५२२ धावांचा डोंगर उभारला.
Highest Test scores for Bangladesh:
Mushfiqur Rahim – 219* vs Zimbabwe, 2018
Shakib Al Hasan – 217 vs New Zealand, 2017
Tamim Iqbal – 206 vs Pakistan, 2015
Mushfiqur Rahim – 200 vs Sri Lanka, 2013
Mohammad Ashraful – 190 vs Sri Lanka 2013
Congratulations to @mushfiqur15! pic.twitter.com/S7WH5YLnwq
— ICC (@ICC) November 12, 2018
- Advertisement -
२ द्विशतके करणारा एकमेव यष्टीरक्षक
मुशफिकूर रहीमचे हे कसोटी क्रिकेटमधील दुसरे द्विशतक होते. कसोटी क्रिकेटमध्ये २ द्विशतक करणारा रहीम हा पहिला यष्टीरक्षक-फलंदाज आहे. याआधी त्याने २०१३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध २०० धावांची खेळी केली होती. त्या सामन्यात मोहम्मद अशरफूलने १९० धावा करत रहीमला चांगली साथ दिली होती.
During his unbeaten knock of 219 in the first innings, @mushfiqur15 becomes the first wicket keeper in history to score two double hundreds in Tests. pic.twitter.com/8PCHrSNYgf
— Bangladesh Cricket (@BCBtigers) November 12, 2018