घरमहाराष्ट्रशंभर तरुणी, महिलांना अंनिसने केले जटमुक्त

शंभर तरुणी, महिलांना अंनिसने केले जटमुक्त

Subscribe

जटचे ओझे घेऊन फिरणाऱ्या १०० महिलांना अंनिस संस्थेच्या वतीने जटमुक्त करण्यात आले आहे.

जग २१ व्या शतकात जरी वाटचाल करत असले, तरी देशातल्या काही गोष्टी अजूनही मागच्याच शतकात असल्याचं सिद्ध करत आहेत. अनेक महिला, तरुणींच्या केसांमध्ये कचरा, धूळ आणि प्रदूषणांमुळे केसांचा गुंता होतो. हा गुंता वाढत जाऊन केसात जट निर्माण होते. मात्र हे देवाचे देणे आहे असे म्हणतं अनेक महिला आणि तरुणी या जटेच ओझ घेऊन फिरत असतात. हे जटेच ओझ घेऊन फिरणाऱ्या शंभर महिला आणि तरुणींना जटमुक्त करण्यात आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या अभियानाच्या माध्यमातून इतर शहरातील तरुणी आणि महिलांना जटमुक्त करण्यात आले आहे.

यामुळे होते जट

अनेकदा जट झाली का ती लपून ठेवण्याकडे अनेक महिलांचा कल असतो. त्यामुळे केसांमधला गुंता वाढत जातो. तर काही महिला देवाचे देणे असल्याच्या अंधश्रद्धेमुळे ती जट काढत नाहीत. मात्र ही जट न काढल्यामुळे केसात उवा, लिखा आणि धुळ यामुळे ती जट अधिक घट होऊन बसते. त्यामुळे डोके देखील जड होऊन डोक्यावर अतिरिक्त भार होतो. काहीवेळा डोक्याला जखमा देखील होतात. ही जट निर्माण झाल्याने ताप येणे, डोके दुखणे तसेच संसर्ग होणे असे प्रकार देखील होत असल्याची माहिती अंनिस संस्थेच्या नंदिनी जाधव यांनी दिली आहे.

- Advertisement -

या कारणामुळे जट काढण्यास महिलांचा विरोध

जट काढण्यास सांगितले गेले त्यावेळी अनेक महिलांनी विरोध केला. जट काढण्यास नकार दिला. तर जट काढल्यामुळे पाप लागेल. घरावर संकट येईल अशी भीती अनेक तरुणींना वाटू लागली. त्यामुळे त्या जट काढण्यास त्यांनी विरोध केला. मात्र समुपदेशन केल्यानंतर त्या तयार झाल्या. पुणे, कोल्हापूर, सातारा, कर्नाटक अशा विविध ठिकाणच्या शंभर महिलांना जटमुक्त करण्यात आले आहे. तसेच ही मुक्ती केवळ जटांमध्ये नसते कर त्याच्याशी निगडित असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींमधून महिलांना मुक्त केल्याचे नंदिनी जाधव सांगतात.

जटमुक्तीनंतर नवा लुक

जट अधिक घट्ट रुतलेली असेल तर ती काढताना टक्कल करुन काढावी लागते अशी अनेक महिलांचा समज असतो. टक्कल केल्यामुळे कुटुंब, नातलग स्विकारणार नाही अशी त्यांना भीती असते आणि याच भीती पोटी ते जट काढण्यास नकार देतात. मात्र ब्यटिशिअनचे प्रगत शास्त्रोक्त शिक्षण घेतलेल्या नंदिनी जाधव या जट कापून केस स्वच्छ करतात आणि महिलांच्या चेहऱ्याला साजेसा असा नवीन लुक देतात. ज्यामुळे त्यांना त्यांचा चेहरा सुंदर आणि उठावदार दिसण्यास मदत होते.

- Advertisement -

जट काढण्याची विचारणा

मुंबईमध्ये अनेकांनी स्वत:हून जट काढण्याची अंनिसकडे विचारणा केली आहे. यातल्या काही महिला उच्चशिक्षित असून त्या विविध क्षेत्रात उत्तम काम देखील करत आहेत. मात्र मुंबईमध्ये देखील काह महिला सध्या जटेचे ओझे घेऊन फिरत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.


संबंधित बातम्या –

वाचा – नवस फेडण्यासाठी मुलाला ८ किमी विवस्त्र चालवले

वाचा – उपचारांसाठी चिमुकली दिली नागाच्या तोंडी, मुलीचा दुर्दैवी मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -