घरलाईफस्टाईलडिझायनर पडदे

डिझायनर पडदे

Subscribe

पडद्यांमुळे घराचे सौंदर्य खुलते. पडद्यांमुळे घराचा चेहरामोहरा बदलून जातो. हल्ली प्रिटेंड पडद्यासोबत गोप पडदे (कर्टन) आणि मोत्याचे पडदेही बाजारात उपलब्ध आहेत.

पडद्यांचे विविध प्रकार 

बाजारात पडद्यांचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. प्रिंटेड व प्लेन कापडही मिळते. आपण त्यापासून विविध डिझाईनममध्ये पडदे शिवून दारे-खिडक्यांना लावू शकतो. याशिवाय वेलवेट, पॉलिस्टर क्रॅश, कॉटन-सिंथेटिक मिक्स मटेरियल आदींमध्ये पडदे उपलब्ध होतात. बाजारात रेडीमेड पडदेही उपलब्ध असतात.काही जण घरात धुळ येऊ नये म्हणूनही पडदे लावतात, तर काहींचा हेतू असतो सजावटीचा.

- Advertisement -

मोत्याचे पडदे 

 सध्या मोत्यांच्या पडद्याची क्रेझ आहे. ते रेडीमेडही मिळतात. सुंदर, रंगबिरंगी मोत्याच्या माळा त्यात लावलेल्या असतात. या पडद्याची किंमत साधारण 600 ते 850 रुपयांपर्यंत असते.

कॉटन-सिंथेटिक मिक्स मटेरियल

पडद्याचे कॉटन-सिंथेटिक मिक्स मटेरियल 70 रुपये ते 250 रु. प्रती मीटर असते. कॉटन- सिंथेटिक मिक्स मटेरियलमध्ये आपल्याला सुंदर फ्लॉवर प्रिंट व लायनिंगचे पडदे मिळतील. हे पडदे मध्यमवर्गीयांची पहिली पसंती आहे.

- Advertisement -

वेलवेटचे पडदे 

वेलवेटचे पडदे फारच मऊ असतात. प्रिंटेड व प्लेन अशा दोन्ही प्रकारात बाजारात उपलब्ध आहे. मात्र हे पडदे फारच महागडे असतात. 200 रुपये प्रती मीटरपासून यांची किंमत सुरू होते.

पॉलिस्टर क्रॅश मटेरियल 

पडदे सुळसुळीत असल्यामुळे याला क्रॅश मटेरियल म्हणतात. याचे प्लेन पडदे बाजारात उपलब्ध असतात. या पडद्यांची किंमत 100 रुपये प्रती मीटरच्या आसपास असते.

विस्कोम गोप कर्टन 

एक प्रकारचा हा रेडिमेड पडदा आहे. जाड दोर्यापासून तो तयार करण्यात येतो. हे पडदे दिसायला फारच सुंदर असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -