घरलाईफस्टाईलउभं राहून पाणी पित असाल तर सावधान

उभं राहून पाणी पित असाल तर सावधान

Subscribe

उभ्याने पाणी प्यावं की बसून प्यावं याबाबत अद्याप लोकांमध्ये संभ्रम आहे. मात्र उभ्यानं पाणी पिणे आरोग्यासाठी घातक आहे. तुम्ही जर उभं राहून पाण्याचे सेवन करत असाल तर हे जरुर वाचा

अनेकदा बाहेरुन आल्यानंतर आपण तडक फ्रिज जवळ जातो आणि पाण्याच्या बॉटलमधील पाणी उभ्यानेच पितो. असे केल्याने अनेकदा ओरडा देखील पडतो. मात्र नेमक उभ्याने पाणी का पिऊ नये? उभ्याने पाणी प्यायल्याने काय परिणाम होतो याची उत्तर मिळत नाही. परंतु तुम्ही जर उभ्याने पाणी पित असाल तर ते नक्कीच घातक असून त्यांनी अनेक शरीराला त्रास होतात.

सांधेदुखी

उभ्याने पाणी प्यायल्याने सांधेदुखीचा त्रास उद्भवतो. यामुळे आर्थरायटिसचा त्रास होण्याची शक्यता असते. उभ्याने पाणी प्यायल्याने सांध्यांतील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते. त्यामुळे क्रॅम्प येणे, गुडघे दुखणे अशा व्याधी उद्भवतात.

- Advertisement -

किडनीचे आजार

उभ्याने पाणी प्यायल्याने ते पाणी शरीरातून थेट वाहून जाते. त्यामुळे त्याचा शरीराला त्याचा विशेष फायदा होत नाही. पाणी वेगाने वाहून गेल्याने किडनी आणि मूत्राशयातील घाण तशीच राहते. त्यामुळे अनेका डॉक्टर देखील बसून पाणी पिण्याचा सल्ला देतात.

जळजळ होणे

उभ्याने पाणी प्यायल्याने अन्ननलिकेच्या खालील भागात जळजळ होण्यास सुरुवात होते. पोट आणि अन्ननलिकेला जोडणाऱ्या स्थायूंवर दाब पडतो आणि त्याला इजा पोहोचण्याचा धोका असतो. त्यामुळे पोटाट जळजळ होण्याचा त्रास होतो.

- Advertisement -

पचनाचे विकार

उभ्याने पाणी प्यायल्यावर थेट पाणी अन्ननलिकेद्वारे पोटात जाते. उभ्याने पाणी प्यायल्यास पाणी अन्ननलिकेच्या स्थायूंवर दाब टाकते. त्यामुळे उभ्याने पाणी प्यायल्यास पचनक्रियेत समस्या निर्माण होतात.

आम्लाचा समतोल राहत नाही

पाणी उभ्याने आणि घाईगडबडीमध्ये प्यायल्याने शरीरामधील आम्लाच्या प्रमाणात समतोल राखला जात नाही. शांतपणे पाणी प्यायल्याने शरीरामधील आम्लाच्या प्रमाणात समतोल राखला जातो. त्यामुळे पाणी शांत बसून प्यावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -