घरमुंबईDHFL प्रकरणी सीबीआयची कारवाई, एकाचवेळी १५ ठिकाणी छापे

DHFL प्रकरणी सीबीआयची कारवाई, एकाचवेळी १५ ठिकाणी छापे

Subscribe

मुंबईत उद्धव ठाकरे सरकारवरील संकटावरून राजकीय घडामोडी सुरू असतानाच आता सीबीआयनेही आर्थिक घोटाळ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. दिवाण हाऊसिंग फायनान्सशी संबंधित ३४,६१५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मुंबईत १५ ठिकाणी एकाचवेळी तपास सुरू केला आहे.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, डीएचएफएलने चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केल्यामुळे, कर्जदारांच्या बँक समूहाचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सीबीआयने कपिल आणि धीरज वाधवन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर बँक फसवणुकीचा आरोप आहे. वाधवान बंधू DHFL चे प्रवर्तक आहेत.

- Advertisement -

देशातील आतापर्यंतची हे सर्वात मोठी बँक फसवणूक प्रकरण आहे. यापूर्वी एबीजी शिपयार्डवर २३,००० कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीएनबी घोटाळाही 14 हजार कोटींचा होता, ज्यामध्ये नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी आरोपी आहेत. दोघेही देश सोडून पळून गेले आहेत.

चार आठवड्यांपूर्वी सीबीआयने कपिल आणि धीरज वाधवन यांना मुंबईतून अटक केली होती. उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लि. (UPPCL) कर्मचार्‍यांचा भविष्य निर्वाह निधी 2631.20 कोटी रुपयांचा अधिकार्‍यांच्या संगनमताने बेकायदेशीर गुंतवणुकीचे हे प्रकरण आहे.

- Advertisement -

यापूर्वी, डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवन यांना दोन वर्षांपूर्वी मे २०२० मध्ये येस बँकेच्या ५,०५० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने कपिलला जामीन मंजूर केला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -