घरCORONA UPDATEराज्यात २५ हजार कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण, १ टक्के रुग्ण व्हेटिंलेटरवर

राज्यात २५ हजार कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण, १ टक्के रुग्ण व्हेटिंलेटरवर

Subscribe

देशात ८१ हजार सक्रीय रुग्ण असून त्यातील २५ हजार एकट्या महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. रुग्णालयात ४.६४ टक्के कोरोना रुग्ण असून मुंबईत सध्या जवळपास ३० टक्के पॉझिटीव्हीटी असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. (Corona Update from Maharashtra, positivity rate)

राज्यातील रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असून सध्या दिवसाला ४ हजार रुग्ण आढळत आहेत.  त्यामुळे मास्क घालणे, आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक  आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत  सांगितले.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी राज्यात दर दिवशी २०० ते ३०० रुग्ण आढळत होते. आता दररोज ४ हजार रुग्ण आढळत असून रुग्ण संख्येत ३६ टक्के वाढ झाली आहे. यापैकी ९० टक्के रुग्ण मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यातील आहेत. सध्या २५ हजार सक्रीय रुग्ण असून १ टक्का रुग्ण ऑक्सिजनवर आहेत तर २२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे अतिरिक्त  मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली.

दरम्यान, आज राज्यात ३ हजार २६० नवे कोरोना रुग्ण सापडल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तर, ३ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, ३ हजार ५३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून रिकव्हर होण्याचा रेट ९७.८३ टक्के आहे. तर, पॉझिटिव्हीटी रेट ९.७३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -