घरमुंबईएमपीएससी घोटाळ्यातील दोषींवर कारवाईची मागणी

एमपीएससी घोटाळ्यातील दोषींवर कारवाईची मागणी

Subscribe

विद्यार्थ्यांचा आझाद मैदानात मोर्चा

‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि सरकारी नोकरभरती घोटाळ्याविरोधात नोकरभरती भ्रष्टाचार विरोधी संघर्ष समिती अधिक आक्रमक झाली आहे. या घोटाळ्याची चौकशी करताना दोषींना तातडीने शिक्षा द्यावी, अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे.
लोकसेवा आयोगाच्या नोकरभरतीतील घोटाळ्याबाबत आधीपासूनच असंतोष खदखदत होता. विद्यार्थ्यांनी काही महिन्यांपूर्वीच सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तरीही त्यांच्या मागणीकडे सरकार कानाडोळा करत आहे, म्हणून संघर्ष समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पुणे ते आझाद मैदान लाँगमार्च काढला.

- Advertisement -

विद्यार्थ्यांचा लाँगमार्च

१९ मे रोजी पुण्यातून निघालेला विद्यार्थ्यांचा लाँगमार्च शुक्रवारी मुंबईतील आझाद मैदानावर येऊन धडकला. यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील घोटाळ्याच्या चौकशीची आणि दोषींना शिक्षा देण्याची मागणी उचलून धरली. त्यानंतर संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांच्या सचिवांची भेट घेतली. या भेटीत सचिवांनी येत्या ८ दिवसांत विद्यार्थ्यांची राज्यपालांशी भेट करून देण्याचे आश्वासन दिले.
१९ मे रोजी पुण्यातील डेक्कन नदीपात्र चौपाटी इथून या लाँगमार्चला सुरूवात झाली आणि गुरूवारी रात्री लाँगमार्च मुलुंडला पोहोचला. यावेळी आंदोलनास परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी मुलुंड इथेच हा लाँगमार्च अडवला. तर काही आंदोलक विद्यार्थांना ताब्यातही घेतले. शुक्रवारी सकाळी विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आले. शुक्रवारी सकाळी लाँगमार्च आझाद मैदानावर धडकला आणि इथे विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शन केली. जर राज्यपालांची भेट झाली नाही वा बैठक झाली नाही, तर राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती योगेश जाधव यांनी दिली.

- Advertisement -

नेमका काय आहे घोटाळा?

एमपीएससी परीक्षेत डमी विद्यार्थी बसवून सरकारी नोकरभरतीत घोटाळा करणाèया रॅकेटचा पर्दाफाश नांदेडमधील मांडवी येथील योगेश जाधव या विद्यार्थ्याने केला. त्यानंतर आजपर्यंत या घोटाळ्याप्रकरणी १०० हून अधिक आरोपी आणि अधिकाèयांना एसआयटी तसेच पोलिसांनी अटक केली. यातील अनेकांना न्यायालयाकडून जामीन मिळाला असून एसआयटी आणि पोलिसांकडून कारवाई सुरूच आहे. मात्र या घोटाळ्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारकडून कुठलीही कडक पावले उचलली जात नसल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. शिवाय या प्रकरणाची चौकशीही म्हणावी त्या वेगाने होत नसल्याचा संघर्ष समितीचा आरोप आहे.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -