तुळशीची लग्न झाली का सुरुवात होते ती लग्नसराईला. लग्न म्हटलं की, खूप दिवसांपासून तयारी केली तरी ती कमीच होते. त्यात नवरदेव आणि नवरीची तयारी म्हणजे बापरे होता होत नाही. मग जशी फॅशन बदलत जाते तसा यांचा पेहराव देखील बदलतो. नवरीला नटायला खूप व्हरायटी असते. नव्या फॅशननुसार ती तिचा लूक बदलते. मात्र, नवरदेव नटणार म्हणजे सुटबूट घालूनच. मात्र कोणत्या सुटवर कोणतं फुटवेअर घालावे आणि हो ते ही आताच्या फॅशनला सूट होणारे देखील असणे तितकेच महत्त्वाचे. असेच खास बाजारात चलती असलेले न्यू लूकचे असे फॅशनेबल फुटवेअर पाहणार आहोत.
डर्बी शूज
डर्बी शूजचा खूप आधीपासून लोक वापर करतात. लग्नात सूटबूट म्हटलं की, डर्बी शूज आलेच. यामध्ये विविध व्हरायटी असून हे घातल्याने एक वेगळा लूक दिसतो. या शूजचा मोठ्या संख्येने वापर केला जातो.
जोधपुरी
जर तुम्ही लग्नात शेरवानी घालणार असाल तर त्यावर जोधपुरी नक्की ट्राय करा. जोधपुरी घातल्यामुळे एक नवा रॉयल लूक येतो. शॉर्ट्स कटवाली जोधपुरीमध्ये अनेक डिजाइन्स आणि विविध रंग मिळतात. त्यामुळे आपल्या शेरवानीला सूट होईल अशी जोधपुरी आपण खरेदी करू शकतो. नेहरु जॅकेट्ससह इंडो-वेस्टर्न लुक करायचा असल्यास त्यावर जोधपुरी नक्की ट्राय करा.
कोल्हापुरी
कोल्हापुरी फूटवेअर घातल्याने एक वेगळा लूक येतो. कोल्हापुरी फूटवेअरमध्ये विविध प्रकार आढळून येतात. यावर खूप सुंदर असे वर्क आणि एम्ब्रॉयडरी असलेल्या फूटवेअर असतात. कोल्हापुर फूटवेअर ही खास करून लग्नामध्ये घालण्यासाठी खरेदी केली जाते. लग्नामध्ये ब्राऊन शेड असलेली फुटवेअर घातल्यास एक वेगळाच लूक येतो. कोल्हापुरी फुटवेअर कोणत्याही कपड्यांवर चांगली दिसते मात्र खास करुन शेरवानीवर अधिक खुलून दिसते.
लोफर्स
लोफर्स फूटवेअर हा एक ट्रेंड खूप पॉप्युलर आहे. नवरदेवाने घातलेल्या कोटवर मॅचिंग लोफर्स घातल्यास उठून दिसतो. लोफर्सची खासियत म्हणजे त्यामध्ये वेगवेगळे रंग आणि मटेरियलमध्ये देखील विविधता आढळून येते.
मोजडी
पंजाबी मोजडी जोधपुरीसारखी दिसणारी असते. यामध्ये विविध व्हरायटी आढळून येतात. शेरवानी आणि मोजडी हे कॉम्बिनेशन भारी दिसते.