इंडोनेशियात फुटबॉल सामन्यादरम्यान मोठा हिंसाचार उफाळून आला. या हिंसाचारात तब्बल १२९ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. तसेच, यामध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे. सामन्याचा निकाल लागल्यानंतर प्रेक्षकांनी मैदानात धुडघूस घातला त्यामुळे हिंसाचार घडला असं पोलिसांनी सांगितलं. (Indonesia Football Match Violence)
इंडोनेशियातील पूर्व जावा भागात ही घटना घडली आहे. येथील मैदानात Persebaya Surabaya आणि Arema FC यांच्यामध्ये फुटबॉल सामना खेळवण्यात आला. या सामन्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. या सामन्यात अरेमा एफसी संघाचा पराभव झाला. त्यामुळे या संघाच्या समर्थकांनी मैदानातच मोडतोड सुरू केली. त्यांनी मारहाणही केली. यामुळे २ पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि ३४ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. हिंसाचाराची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि इंडोनेशियन राष्ट्रीय सशस्त्र दलाचे जवान स्टेडियमवर पोहोचले. त्यांनी खेळाडूंना सुरक्षितपणे स्टेडियमबाहेर काढलं. उर्वरित जखमी रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान ९३ लोकांचा मृत्यू झाला.
NEW – Over 100 people were killed tonight in riots that broke out at a football match in Indonesia.pic.twitter.com/hGZEwQyHmL
— Disclose.tv (@disclosetv) October 1, 2022
Persebaya Surabaya ने इंडोनेशियातील Arema FC संघावर मात करत फुटबॉल सामना 3-2 अशा फरकानं जिंकला. त्यामुळे Arema FC च्या नाराज चाहत्यांनी खेळाडूंवर हल्ला केला. या घनटेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलीस हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. तसंच, पोलिसांकडून लाठीजार्च झाल्याचंही यामध्ये दिसतंय. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.