घरक्रीडाक्रिकेटच्या मैदानातून गंभीर राजकारणाच्या आखाड्यात?

क्रिकेटच्या मैदानातून गंभीर राजकारणाच्या आखाड्यात?

Subscribe

मी राजकारण येणार नाही असं भारताचा क्रिकेटर गौतम गंभीरनं म्हटलं आहे.

दोन दिवसांपूर्वी भारताचा स्टार क्रिकेटर गौतम गंभीरनं क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर सुरू झाली ती चर्चा म्हणजे, गंभीर राजकारणात प्रवेश करणार अशी. क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर गौतम गंभीर आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार असल्याच्या चर्चा रंगल्या. पण, त्यावर आता गौतम गंभीरनं स्पष्टीकरण दिलं आहे. राजकारणात प्रवेश करण्याच्या बातम्या या केवळ अफवा असल्याचं गौतम गंभीरनं म्हटलं आहे. मुंबई मिररशी बोलताना गंभीरनं राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातमीचं खंडन करत त्या बातम्या म्हणजे केवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे.

यापूर्वी गौतम गंभीर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.  मागील काही दिवसांपासून क्रिकेटपासून दुरावलेला गौतम गंभीर सामाजिक विषयांवर आपलं मत मांडत होता. त्यानंतर भाजप गौतम गंभीरला दिल्लीतून लोकसभा निवडणुकीसाठी तिकिट देणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र या साऱ्या बाबींवर गौतम गंभीरनं समोर येत त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मी राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या म्हणजे केवळ अफवा आहेत असं गौतम गंभीरनं मुंबई मिररशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -